Sangli: दसरा मेळाव्यामध्ये राजकारण..! ग्रामपंचायतीच्या एका निर्णयाने भाजप नेत्याची कोंडी, सांगली जिल्ह्यात नेमकं काय घडले?
दसरा मेळावाच्या माध्यमातून विचारांचे सोने लूटले जात असत पण आता त्याचे स्वरुप बदलत आहे. शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे हे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेत होते. पण आता जिल्हानिहाय मेळावे पार पडत आहेत.
शंकर देवकुळे टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी : सांगली : दसरा मेळाव्यावरुन राज्याचे राजकारण (Politics) तापले आहे. केवळ मुंबईच नाहीतर आता राज्यातील विविध ठिकाणी आता या मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. भाजप आ. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनीही आरेवाडीत दसरा मेळावा घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, त्यांनी जागेसाठी ग्रामपंचायतीकडे अर्जही केला होता. त्यांच्या मेळाव्याला ग्रामपंचायतीने तर विरोध दर्शवला आहेच पण देवस्थान कमिटीनेही हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांचा दसरा मेळावा (Dussehra Rally) होईल का नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ज्याप्रमाणे शिवसेना आणि शिंदे गटाची चर्चा ही शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरुन झाली तशीच काहीशी परस्थिती सांगली जिल्ह्यात पाहवयास मिळत आहे.
यंदा दसरा मेळाव्याला एक वेगळेच महत्व आले आहे. खरं तर या मेळावाच्या माध्यमातून विचारांचे सोने लूटले जात असत पण आता त्याचे स्वरुप बदलत आहे. शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे हे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेत होते. पण आता जिल्हानिहाय मेळावे पार पडत आहेत.
सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे दसरा मेळावा घेण्यास परवागी द्यावी अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली होती. मात्र, दुसरीकडे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनीही ग्रामपंचायतीकडे परवानगी मागितली होती.
गावात कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ग्रामपंचाय आरेवाडीने दोघांनाही परवानदगी नाकारली आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे यांना देखील आता मेळावा घेता येणार नाही.
परवानगी नाकारल्याबद्दलचे पत्र कवठेमहांकाळ पोलीस ठाणे आणि जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आले आहे. या मेळाव्याला ग्रामस्थ आणि देवस्थान समितीनेही विरोध दर्शवला आहे.
गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे यांनी ग्रामपंचायत आणि देवस्थान कमिटीकडे दसरा मेळावा घेण्यासंदर्भात परवानगी मिळावी असे अर्ज केले होते. मात्र, दोन्ही अर्जावर एकच तारिख असल्याने परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे 2 ऑक्टोंबरला नेमके काय होणार हे पहावे लागणार आहे.