शिवसेनेचे निम्मे आमदार राष्ट्रवादीविरोधातच जिंकले

एकिकडे युतीत असणारे भाजप-शिवसेना मित्रपक्ष यांनी फारकत घेतली आहे, तर दुसरीकडे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले गेलेले शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस (Politics between NCP and Shivsena in Maharashtra) एकत्र येत असताना दिसत आहेत.

शिवसेनेचे निम्मे आमदार राष्ट्रवादीविरोधातच जिंकले
Follow us
| Updated on: Nov 13, 2019 | 9:34 PM

औरंगाबाद : राज्यात सत्तास्थापनेचं वेगळंच समीकरण पाहायला मिळत आहे. एकिकडे युतीत असणारे भाजप-शिवसेना मित्रपक्ष यांनी फारकत घेतली आहे, तर दुसरीकडे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले गेलेले शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस (Politics between NCP and Shivsena in Maharashtra) एकत्र येत असताना दिसत आहेत. विशेष म्हणजे राज्याच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी (Politics between NCP and Shivsena in Maharashtra) दोन्ही पक्ष एकमेकांचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी असल्याचं समोर आलं होतं. शिवसेनेच्या 56 आमदारांपैकी अर्धे आमदार राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवून जिंकले आहेत. यावरुन हे नवं समीकरण किती आव्हानात्मक असणार आहे याची कल्पना येऊ शकते.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या जवळपास 26 आमदारांचा पराभव राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी केला आहे. स्थानिक पक्ष म्हणून शिवसेनेची राज्यामध्ये लढाई राष्ट्रवादीसोबतच असल्याचं उपलब्ध आकडेवरुन दिसत असल्याचं मत राजकीय विश्लेषक सुशील कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे. सुशील कुलकर्णी म्हणाले, “राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्ष प्रामुख्याने महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष आहेत. त्यामुळे राज्याच्या अस्मितेच्या मुद्द्यावर मिळणाऱ्या मतांची विभागणी या दोन पक्षांमध्येच होते. प्रादेशिक अस्मितेवरील जवळजवळ सर्व मते या दोन पक्षांनाच मिळतात.”

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत जाताना विचारधारा आणि मुद्द्यांमध्ये विरोधाभास असल्याने शिवसेनेच्या आमदारांची सर्वाधिक अडचण होत आहे. यामुळे पुढील निवडणूक लढताना शिवसेनेला मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. म्हणूनच शिवसेनेचे आमदार आघाडीसोबत जाण्यास इच्छूक नाही. मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता नव्हती. 2014 नंतर त्यांना सत्ता मिळाली. अशास्थितीत शिवसेनेच्या आमदारांनी आपली ताकद लावून निवडणूक लढली आहे. मात्र, आता पुन्हा निवडणूक होणार असेल, तर सतत होणारा खर्च शिवसेनेच्या आमदारांना परवडणारा नाही, असंही कुलकर्णी यांनी सांगितलं.

सुशील कुलकर्णी म्हणाले, “शिवसेनेचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबतचे सरकार स्थिर असण्याची शक्यता देखील कमी आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांचा स्वतःच्या बळावर निवडून येणारा एक गट आघाडीपेक्षा भाजपसोबत जाण्यास अधिक इच्छूक आहे.”

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.