Sanjay Raut on Media : राजकारण रोजचेच, त्या पलीकडे देखील जग, संजय राऊतांचं ट्विट, नेमकं काय म्हटलंय? जाणून घ्या….

दिवसाच्या प्रत्येक मिनिटाला काही ना काही राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, टीका टीप्पणी येतातच . त्यावरुन संजय राऊतांनी हे ट्विट केलं असून 'महाराष्ट्राची ही कन्या देशाचे प्रतिनिधित्व करते' ही देखील बातमी दाखवा असं सुचित केलंय.

Sanjay Raut on Media : राजकारण रोजचेच, त्या पलीकडे देखील जग, संजय राऊतांचं ट्विट, नेमकं काय म्हटलंय? जाणून घ्या....
शिवसेना नेते संजय राऊतImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 3:33 PM

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एक ट्विट केलंय. आज केलेलं संजय राऊत यांचं हे तिसरं ट्विट (Tweet) आहे. यापूर्वी त्यांनी दोन राजकीय ट्विट केले होते. तर आताचं ट्विट हे माध्यमांवर आहे. ‘राजकारण रोजचेच आहे. त्या पलीकडे देखील जग आहे. महाराष्ट्राची ही कन्या देशाचे प्रतिनिधित्व करते आहे. जय महाराष्ट्र,’ असं ट्विट संजय राऊत यांनी करून माध्यमांना (Media) फक्त राजकारण आणि राजकारण इतकंच न करता इतरही बातम्या दाखवण्याचं यातून सुचित केलं आहे. राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून रोज राजकीय घडामोडींना वेग असतो. प्रत्येक मिनिटाला राजकीय घडामोडी घडत असतात. राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, टीका टीप्पणी देखील मिनिटा मिनिटाला येत असतात. त्यावरुन संजय राऊतांनी हे ट्विट केलं असून ‘महाराष्ट्राची ही कन्या देशाचे प्रतिनिधित्व करते’ ही देखील बातमी दाखवा असं सुचित केलंय.

संजय राऊतांचं तिसरं ट्विट

यापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी दोन ट्विट केले आहेत.

 संजय राऊतांचं पहिलं ट्विट

यापूर्वी देखील शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटमध्ये राऊत यांनी विठ्ठलाचा आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ट्विट केला. त्यामध्ये विठ्ठल विठ्ठल, असाही उल्लेख संजय राऊत यांनी केलाय.

शिंदे गटावर ट्विट

…जेंव्हा स्वतःला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते,’ असं लिहित शिवसेना नेते संजय राऊतांनी अस्वलाचा व्हिडीओ ट्विट करत एकनाथ शिंदे गटावर टीका केली आहे. शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटानं वेगळी वाट पकडल्यानं शिवसेना विरुद्ध शिंदे गट, असा संघर्ष निर्माण झालाय. यातच वारंवार शिवसेना नेते संजय राऊत हे एकनाथ शिंदे गटावर टीका करतान दिसत आहे. राऊत त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून बंडखोर गटावर सडकून टीका करताना दिसतात. यातच आता संजय राऊत यांनी एक अस्वलाचा व्हिडीओ ट्विट करत शिंदे गटाला लक्ष्य केलंय.

संजय राऊतांचं दुसरं ट्विट

‘…जेंव्हा स्वतःला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते,’ असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्या गटाला लक्ष्य केलंय. यामुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.