Mumbai Municipal : मुंबई महापालिकेकडून ‘ हर घर तिरंगा ‘ अभियनातही राजकारण, राहुल शेवाळेंचे थेट मुख्यमंत्र्यानाच निवेदन

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात पालिकेच्या प्रत्येक होर्डिंग वर तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो असायचे. मात्र, राज्यातील नव्या शिवसेना - भाजपा सरकारच्या आकसापोटी आणि जुन्या सरकराप्रती असलेली आपली निष्ठा अधोरेखित करण्यासाठीच पालिका आयुक्त अशा हीन पातळीचे राजकारण करत आहे. त्यामुळे पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्यावर कारवाईची मागणी शेवाळे यांनी केली आहे.

Mumbai Municipal :  मुंबई महापालिकेकडून ' हर घर तिरंगा ' अभियनातही राजकारण, राहुल शेवाळेंचे थेट मुख्यमंत्र्यानाच निवेदन
खा. राहुल शेवाळेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 9:09 PM

मुंबई : सबंध देशात यंदा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त (Har Ghar Tiranga) ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबवले जात आहे. त्याअनुशंगाने गल्ली ते दिल्ली तयारी सुरु असून देशातील प्रत्येक नागरिकाला यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. (Mumbai Municipal) मुंबई महापालिकेच्या होर्डिंग्जवरुन मात्र आता वेगळेच राजकारण सुरु झाले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘ हर घर तिरंगा ‘ अभियाना विषयी मुंबईत लावलेल्या होर्डिंग्ज वर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र लावण्यात आले नसून हा राजशिष्टाचाराचा भंग आहे, असा आरोप लोकसभेतील शिवसेना गटनेते (Rahul Shewale) खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. एवढेच नाहीतर राजशिष्टाचाराचा भंग करणाऱ्या पालिका आयुक्तांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

‘हर घर तिरंगा’ या अभियनाची जनजागृती करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून विविध जनजागृती मोहीमा राबविताना जाहिराती, भित्तीपत्रके, होर्डिंग्ज अशा निरनिराळ्या माध्यमांचा उपयोग केला जातो. पालिकेच्या वतीने लावण्यात येणाऱ्या होर्डींग्ज वर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्याची अनेक वर्षांपासूनची प्रथा आहे. मात्र, सध्या मुंबई महानगर पालिकेच्या, ‘ हर घर तिरंगा ‘ या अभियाना विषयीच्या होर्डिंग्ज वर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र अथवा त्यांच्या नावाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आला आहे. त्यामुळे हा राजशिष्टाचाराचा भंग आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच केली आहे.

शासकीय कामांमध्ये राजकारण का?

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात पालिकेच्या प्रत्येक होर्डिंग वर तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो असायचे. मात्र, राज्यातील नव्या शिवसेना – भाजपा सरकारच्या आकसापोटी आणि जुन्या सरकराप्रती असलेली आपली निष्ठा अधोरेखित करण्यासाठीच पालिका आयुक्त अशा हीन पातळीचे राजकारण करत आहे. त्यामुळे पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्यावर कारवाईची मागणी शेवाळे यांनी केली आहे.

‘हर घर तिरंगा’ अभियानाची जनजागृती

आतापर्यंत राष्ट्रीय सण हे शासकीय कार्यालयापर्यंतच मर्यादित होते. पण यंदा स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने केंद्राच्या माध्यमातून वेगळी संकल्पना राबवण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकांच्या घरावर तिरंगा झेंडा हा फकडावा या उद्देशाने हे अभियान राबवले जात आहे. शिवाय स्थानिक पातळीवरही तिरंगा घरोघरी जाऊन दिला जात आहे. मात्र, मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जनजागृतीबाबक आक्षेप घेण्यात आला आहे. आता शेवाळेंच्या मागणीवर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.

ही पण बातमी वाचा

Airtel 5G Network: ‘एअरटेल’ भारतीय ग्राहकांसाठी 5G क्रांती आणण्यासाठी सज्ज!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.