आढावा : घरचा की बाहेरचा, कोथरुडमध्ये कोण बाजी मारणार?

विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election) प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच कोथरुड विधानसभा मतदारसंघाकडे (Politics in Kothrud) संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

आढावा : घरचा की बाहेरचा, कोथरुडमध्ये कोण बाजी मारणार?
Follow us
| Updated on: Oct 19, 2019 | 3:58 PM

पुणे : विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election) प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच कोथरुड विधानसभा मतदारसंघाकडे (Politics in Kothrud) संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. कोथरुड मतदारसंघात मागील 15 दिवसांमध्ये अनेक नाट्यमय वळणं (Politics in Kothrud) आली आहेत. विद्यमान आमदार आणि स्थानिक प्रबळ इच्छुकांचे तिकीट कापून भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सुरक्षित मतदारसंघ म्हणून येथून उमेदवारी दिली. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात (Politics in Kothrud) तीव्र नाराजी उमटली होती.

कोथरुडमध्ये ठिकठिकाणी फलक लावून “बाहेरचा नको स्थानिक हवाय, आमचा आमदार कोथरूडचा हवाय” या शब्दात पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली होती. साहजिकच चंद्रकांत पाटील यांना याची दखल अखेरच्या दिवसांपर्यंत घ्यावी लागली. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतही आपण कसे पुणेकर आहोत यावरच भर द्यावा लागल्याचे पाहायला मिळाले.

अशातच मनसेचे स्थानिक तरुण उमेदवार किशोर शिंदे यांना स्थानिक जनतेकडून चांगला पाठिंबा मिळताना दिसत आहे. हे हेरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने देखील किशोर शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांना पूर्णवेळ कोथरुड मतदारसंघातच राहावं लागलं आहे. यातून विरोधकांनी पाटलांची नाकेबंदी केल्याचंही बोललं जात आहे.

भाजपला कोथरुडमधून लोकसभेच्या वेळी 1 लाख 15 हजारांचं मताधिक्य मिळालं होतं. आता हेच मताधिक्य कमी होण्याची भीती भाजपला आहे. त्यामुळेच पुणे शहरातील 8 मतदारसंघांपैकी एकट्या कोथरुडमध्ये भाजपने मोठी यंत्रणा कामाला लावली. मोठ्या नेत्यांच्या सभा, बैठका एवढेच न्हवे तर गुजरात, राजस्थानमधील नेत्यांच्या सर्वाधिक बैठका याच मतदारसंघात झाल्याचे पाहायला मिळत होते.

कोथरुडमध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. केवळ पुढील महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीचा विचार करून अनेकांनी मतदारसंघात आणि आपल्या प्रभागात ठाण मांडले आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार गिरीश बापट यांच्याकडे कोथरुड मतदारसंघातील समन्वयाची जबाबदारी दिली आहे. यामुळे नाराजीचा फटका बसू नये यासाठी भाजपने सर्व लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळत आहे.

...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.