नक्षलींचा पुन्हा हैदोस, बोलेरोतून उतरवून महिला पोलिंग अधिकाऱ्यावर गोळीबार

भुवनेश्वर (ओदिशा) : निवडणुकीच्या धामधुमीत नक्षलवाद्यांनी पुन्हा धुमाकूळ घातला. ओदिशात पोलिंग पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. बोलेरो गाडी थांबवून पोलिंग पथकाला खाली उतरवले, त्यानंतर महिला अधिकाऱ्यावर नक्षलवाद्यांनी गोळया झाडल्या. इतकंच नाही तर नक्षलवाद्यांनी बोलेरो गाडीही पेटवून दिली. संजुक्ता दिगल (Sanjukta Digal) असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. ओदिशातील बार्ला गावाजवळ ही धक्कादायक घटना घडली. याच जिल्ह्यात […]

नक्षलींचा पुन्हा हैदोस, बोलेरोतून उतरवून महिला पोलिंग अधिकाऱ्यावर गोळीबार
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 11:41 AM

भुवनेश्वर (ओदिशा) : निवडणुकीच्या धामधुमीत नक्षलवाद्यांनी पुन्हा धुमाकूळ घातला. ओदिशात पोलिंग पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. बोलेरो गाडी थांबवून पोलिंग पथकाला खाली उतरवले, त्यानंतर महिला अधिकाऱ्यावर नक्षलवाद्यांनी गोळया झाडल्या. इतकंच नाही तर नक्षलवाद्यांनी बोलेरो गाडीही पेटवून दिली. संजुक्ता दिगल (Sanjukta Digal) असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. ओदिशातील बार्ला गावाजवळ ही धक्कादायक घटना घडली.

याच जिल्ह्यात एक भुसुरुंग स्फोटही घडवण्यात आला. सुदैवाने पोलिंग पथक निघून गेल्यावर हा स्फोट झाल्याने जीवितहानी टळली. कंधमाल जिल्ह्यातील गोछापाडा मार्गावर ही घटना घडली. ओदिशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु असताना, नक्षलवाद्यांनी हा हैदोस घातला.

ओदिशातील 5 जागांसाठी आज मतदान होत आहे.  ओदिशात लोकसभेच्या एकूण 21 जागा आहेत.

त्याआधी गडचिरोली, छत्तीसगडमध्येही नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी 9 एप्रिलला छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये भीषण स्फोट केला होता. त्यावेळी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजप आमदारासह पाच जवान शहीद झाले होते.भाजप आमदार भीमा मंडावी यांचा ताफा ज्या रस्त्याने जात होता, त्या रस्त्यावर भूसुरुंग लावून स्फोट घडवण्यात आला, ज्यामध्ये आमदार आणि पाच जवानांचाही मृत्यू झाला होता.

देशभरात 95 जागांवर मतदान

दरम्यान, लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज महाराष्ट्रातील 10 जागांसह देशभरातील 97 जागांवर मतदान होत आहे. तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, ओदिशा, आसाम, छत्तीसगड, प. बंगाल, जम्मू काश्मीर, मणिपूर आणि पाँडेचेरीत मतदान होत आहे.

संबंधित बातम्या

नक्षलवाद्यांचा भाजपच्या ताफ्यावर हल्ला, आमदारासह पाच जवान शहीद  

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, 4 जवान शहीद 

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.