Assembly Election 2023 : गुलाबी साडी, काळा चष्मा, मतदान कर्मचार्‍याचा हटके अंदाज, लोक म्हणाले… वाह क्या बात है

आपल्या स्टायलिश स्टाईलबाबत त्या म्हणाल्या की, त्यात काहीही चुकीचे नाही. पुरुषप्रधान समाजात स्त्रियांची स्वतःची ओळख असायला हवी. पुरुषांपेक्षा आम्ही अधिक सक्रिय दिसले पाहिजेत.

Assembly Election 2023 : गुलाबी साडी, काळा चष्मा, मतदान कर्मचार्‍याचा हटके अंदाज, लोक म्हणाले... वाह क्या बात है
MP Assembly Election 2023Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Nov 16, 2023 | 10:34 PM

मध्य प्रदेश | 16 नोव्हेंबर 2023 : 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान एका महिला अधिकाऱ्याचा एक वेगळं आणि हटके लुक चर्चेत आला होता. पिवळी साडी परिधान केलेल्या महिला मतदान अधिकाऱ्याचा तो फोटो खूपच व्हायरल झाला होता. रीना द्विवेदी नावाची ती पोलिंग ऑफिसर तिच्या लूकमुळे प्रसिद्ध झाली. रीना द्विवेदी इतकी प्रसिद्ध झाली की इंटरनेटवर तिची फॅन फॉलोइंग खूप मोठ्या प्रमाणात वाढले. रीना द्विवेदी हिच्याप्रमाणेच आता आणखी एक पोलिंग ऑफिसर तिच्या हटके लुकमुळे चर्चेत आली आहे. 2023 च्या मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये ही महिला पोलिंग ऑफिसर म्हणून काम करत आहे.

मध्यप्रदेशमधील सीएम राइज स्कूल बिस्तान येथे विराज नीमा या प्राथमिक शिक्षक आहेत. लोकशाहीच्या मोठ्या सणात आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. विराज नीमा या त्यांना नेमून दिलेल्या नूतन नगर येथील बूथ केंद्रावर दाखल झाल्या. त्यावेळी त्यांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले.

विराज नीमा या मध्य प्रदेशातील खरगोन येथील पीजी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये मतदानाचे साहित्य घेण्यासाठी आल्या होत्या. गुलाबी रंगांची साडी, डोळ्यावर काळा चष्मा, हातात चमचमते घड्याळ आणि एका हातात EVM मशीन असा विराज निमा यांचा हा लूक पाहण्यासारखा होता.

मतदान कर्मचार्‍यांसाठी असलेल्या रांगेत आपल्या सहकाऱ्यांसह त्या रांगेत उभ्या होत्या. मात्र, त्यांच्या या लुककडे सर्व अधिकाऱ्यांसह महिलांच्याही नजरा वळल्या होत्या. मतदान अधिकारी विराज नीमा यांनी सांगितले की, मध्यप्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणुकीत आपले कर्तव्य त्यांनी बजावले आहे. निवडणुकीत ड्युटी देणे हा ही एक विशेष अनुभव आहे. त्याचबरोबर लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होता आले त्यामुळे आपण स्वतःला भाग्यवान समजतो असे त्या म्हणाल्या.

2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेश येथील रिवा द्विवेदी यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रीना द्विवेदी या राजधानी लखनऊच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. निवडणुकीत त्यांची ड्युटी मोहनलालगंजच्या मतदान केंद्रावर होती. त्यावेळी पिवळी साडी आणि गडद चष्म्यांमध्ये ईव्हीएम मशीन घेऊन जाताना त्या दिसल्या होत्या. त्याची चर्चा आजही होते.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.