एकनाथ शिंदेंचे सरकारमध्ये पंख छाटण्याच्या हालचाली : सूत्र

ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याच्या हालचालींना वेग आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

एकनाथ शिंदेंचे सरकारमध्ये पंख छाटण्याच्या हालचाली : सूत्र
Follow us
| Updated on: Jan 13, 2020 | 7:15 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याच्या हालचालींना वेग आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे (Big decision about Eknath Shinde). एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खात्याचं एकप्रकारे विभाजन करण्यात येणार आहे. नगरविकास खाते – 3 हे नवीन खाते तयार करण्याची तयारी ठाकरे सरकारने केली आहे. या खात्यात राज्यातील सर्व प्रकल्प म्हणजे मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, सिडको अशा अनेक महत्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी असेल. हे खाते थेट मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असेल. याबाबतचा अध्यादेश आजच निघण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या दोन खाती आहेत. यात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्यांचा समावेश आहे. यापैकी एक नगरविकास खात्यामध्ये बदल होण्याची चिन्हं आहेत . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरविकास खाते – 3 हे नवं खातं तयार करण्याची तयारी केली आहे. लवकरच यावर निर्णय होऊन अध्यादेशही निघणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या हालचालींमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ असल्याचं बोललं जात आहेत. मागील 4 दिवसांपासून एकनाथ शिंदे नॉट रिचेबल येत आहेत. विशेष म्हणजे सुरुवातील एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहखाते देण्यात आलं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या खातेवाटपात गृहखातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलं. आता नगरविकास खात्यातील प्रकल्पही एकनाथ शिंदेंच्या अधिकाराबाहेर जाणं हा त्यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे. आता एकनाथ शिंदे यांच्याकडे केवळ सार्वजनिक बांधकाम खातं (सार्वजनिक उपक्रम) राहिलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्रीपदाच्या वाटपात स्वतः पुढाकार घेऊन नक्षलप्रभावित गडचिरोलीचं पालकमंत्रिपद मागून घेतलं. पक्षातही संघटन बांधणीत त्यांनी मोठी कामगिरी केली. विशेष म्हणजे सत्तास्थापन होण्याआधी शिवसेनेच्या आमदारांची एकत्र मोट बांधण्यात एकनाथ शिंदे यांची मोठी भूमिका होती. त्यामुळे यानंतरही होत असलेल्या या हालचालींमुळे एकनाथ शिंदे यांच्या गटात मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.