Video Special Report | भावकीचा वाद रामायण, महाभारतात चुकला नाही, ठाकरे यातून कसे सुटतील?

शिवसेना फुटीनंतर इतर 3 ठाकरे अनेक दशकांनंतर काल राजकीय मंचावर दिसले. यामुळे भविष्यात ठाकरेंमध्येही भावकीचा वाद निर्माण होईल अशी चर्चा रंगलेय.

Video Special Report | भावकीचा वाद रामायण, महाभारतात चुकला नाही, ठाकरे यातून कसे सुटतील?
Follow us
| Updated on: Oct 06, 2022 | 11:29 PM

मुंबई : शिवाजी पार्कात शिवसेनेच्या सभेत एक ठाकरे होते. मात्र, त्याचवेळेला 3 इतर ठाकरे बीकेसी मैदानातल्या शिंदेंच्या मंचावर पोहोचले. महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही जण सक्रीय आहेत. मात्र, शिवसेना फुटीनंतर इतर 3 ठाकरे अनेक दशकांनंतर काल राजकीय मंचावर दिसले. त्यामुळे आता थेट नसला तरी भविष्यात ठाकरेंमध्येही भावकीचा वाद निर्माण होईल अशी चर्चा रंगली आहे.

या मेळाव्याला उद्धव ठाकरेंचे मोठे बंधू जयदेव ठाकरे शिंदे गटाच्या मंचावर आले. उद्धव ठाकरेंच्या दुसरे बंधू दिवंगत बिंदुमाधव ठाकरेंचे पुत्र निहार ठाकरेंनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. उद्धव ठाकरेंच्या वहिनी स्मिता ठाकरेंनी शिंदे गटाच्या मेळाव्याला हजेरी लावली.

बहुदा या पिढीनं पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरेंचे दुसरे पुत्र जयदेव ठाकरेंना राजकीय मंचावर पाहिले. शिंदेंनंतर जयदेव ठाकरे स्टेजवर आले. ठाकरेंनी हातात माईक घेतल्यावर ते सुद्धा शिंदे गटातून नवी सुरुवात करतात की काय, अशीही शंका अनेकांना होती. मात्र, त्या चर्चेला त्यांनी विराम देत शिंदेंना पाठिंबा दिला. जयदेव ठाकरेंनी शिंदेंना पाठिंबा तर दिला मात्र पुन्हा फेरनिवडणुका घेण्याचं आवाहनही केलं.

इतिहासात शिवसेना फुटीनंतर पहिलाच दसरा मेळावा झाला आणि इतिहासात पहिल्यांदाच जिथं पारंपरिक दसरा मेळावा व्हायचा त्या उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यापेक्षा शिंदे गटाच्या मंचावर ठाकरे परिवाराच्या सदस्यांची संख्या जास्त होती.

ठाकरे परिवारात सध्या कोण नेमकं कुठं आहे? अशी आहे ठाकरे परिवाराची वंशावळ

  • प्रबोधनकार ठाकरे आणि रमाबाई ठाकरेंना 3 मुलं
  • रमेश ठाकरे, बाळासाहेब ठाकरे-त्यांच्या पत्नी मिना ठाकरे, आणि श्रीकांत ठाकरे-त्यांच्या पत्नी कुंदा ठाकरे
  • बाळासाहेब ठाकरेंना ३ मुलं… मोठे बिंदूमाधव ठाकरे, मधले जयदेव ठाकरे आणि धाकटे उद्धव ठाकरे
  • श्रीकांत ठाकरेंच्या परिवारात राज ठाकरे आणि त्यांच्या बहिण जयवंती ठाकरे
  • इकडे बाळासाहेब ठाकरेंचे दिवंगत पुत्र बिंदूमाधव ठाकरेंना २ मुलं, एक निहार ठाकरे आणि दुसरी नेहा ठाकरे
  • जयदेव ठाकरेंची तीन लग्नं झाली., पहिल्या पत्नी जयश्री ठाकरे, दुसऱ्या पत्नी स्मिता ठाकरे आणि तिसऱ्या पत्नी अनुराधा ठाकरे
  • जयदेव ठाकरेंना 3 मुलं आणि एक मुलगी आहे
  • उद्धव ठाकरेंना दोन मुलं. आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे.
  • राज ठाकरेंना एक मुलगा आणि एक मुलगी. अमित ठाकरे आणि उर्वशी ठाकरे
  • यापैकी उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष आहेत
  • ठाकरे परिवारात बिंदुमाधव ठाकरेंचे पुत्र निहार ठाकरेंनी शिंदे गटाला पाठिंबा दिलाय.
  • जयदेव ठाकरेंनी सुद्धा शिंदेंचं राज्य यावं म्हणत शिंदेंच्या मंचावर हजेरी लावली. त्यांच्या दुसऱ्या पत्नी स्मिता ठाकरेंनी सुद्धा शिंदे गटाला पाठिंबा दिलाय
  • राज ठाकरेंनी थेट पाठिंबा दिलेला नसला तरी शिंदे गटाशी काही प्रमाणात त्यांची जवळीक आहे

शिवसेना याआधी अनेकदा फुटली. मात्र, यावेळची फूट अशाच काही गोष्टींनी वेगळी आहे.. बाळासाहेब ठाकरे हयात नसताना शिवसेनेतलं हे पहिलं बंड आहे. फक्त आमदार-खासदार नाहीत, तर बाळासाहेब ठाकरेंचे सेवेकरी थापापासून ते रक्ताच्या नात्याची लोकांनी शिंदेंना पाठिंबा दिलाय.

मात्र, ही मंडळी शिवसेना फुटीआधी राजकारणात सक्रीय होती का, हा सुद्धा मुद्दा आहेच. कालच्या मेळाव्यानं दोन्हीकडे मोठी गर्दी जमली. शेवटी फूट पक्षातली असो वा भावकीतली. कोण योग्य आणि कोण अयोग्य याचा फैसला दोन्हीकडे जमलेली ही गर्दीच करणार आहे.

मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.