निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणीची शक्यता
निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी या मागणी करता ठाकरे गटाच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणीची शक्यता आहे.
नवी दिल्ली : शिंदे गट आणि ठाकरे अशा दोन्ही गटाकडून धनुष्यबाण या चिन्हावर दावा करण्यात आला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून (Election Commission) धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं. तसेच पुढील निर्णय येईपर्यंत दोन्ही गटाला शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाहीये. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह तर बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं आहे. आणि ठाकरे गटला शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे. दोन्ही गट अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक या चिन्हांनी लढवणार आहेत. मात्र ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात (High Court) आव्हान देण्यात आलं आहे.
दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी?
निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी या मागणी करता ठाकरे गटाच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणीची शक्यता आहे. आज दुपारी बारा वाजता ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी होऊ शकते. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे.
आज तरी दिलासा मिळणार का?
उद्धव ठाकरे गटाच्या वतीने निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. आज सुनावणी झाल्यास ठाकरे गटाला दिलासा मिळणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.