MNS : ‘गद्दारांना ठोका! ठाकरे ब्रँड वाचवा!’ बंड एकनाथ शिंदेचं, अडचणीत शिवसेना आणि पोस्टर मनसेचं

आतापर्यंतचे कोकणतील पाच आमदार फोडण्यात शिवसेनेला यश आलंय.

MNS : 'गद्दारांना ठोका! ठाकरे ब्रँड वाचवा!' बंड एकनाथ शिंदेचं, अडचणीत शिवसेना आणि पोस्टर मनसेचं
पाहा पोस्टर नेमकं कुणी लावलं?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 11:56 AM

रत्नागिरी : आता शिवसेनेचं (Shiv sena News) काय होणार? एकनाथ शिंदे काय करणार? उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राजीनामा देणार? महाविकास आघाडीचं सरकार पडणार? शिवसेना भाजपसोबत सत्तेत बसणार? या अशा अनेक प्रश्नांसोबतच सध्या महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली, रस्त्त्यारस्त्यावर आणि नाक्या-नाक्यावर चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रातला राजकीय भूकंप आणि त्याचे पडसाद उमटत असताना एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात पोस्टरबाजी करण्यात आली. कल्याण-डोंबिवलीसह ठाण्यातही पोस्टरबाजी झाली. त्यानंतर नागपुरात शिवसेनेच्या समर्थनात बॅनर लागल्याचं दिसून आलं होतं. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याच्या आशयाचेही बॅनर लागले. तर तिकडे अमरावतीत रवी राणांनाही मंत्रिपदाच्या शुभेच्छा देणार्या बॅनरची चर्चा रंगली होती. या सगळ्या राजकीय घडामोडींत आता कोकणातून एका बॅनरने सगळ्यांचं लक्ष वेधलंय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे बॅनर ना शिवसेनेनं लावलं आणि नाही एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी. हे बॅनर चक्क मनसेकडून (MNS Poster News) लावण्यात आलं आहे. मनसेचे सरचिटणीस असलेल्या वैभव खेडेकर यांनी हा बॅनर लावलाय.

गद्दारांना ठोका!

कोकणची भूमी निष्ठावंतांची, गद्दारांना ठोका, ठाकरे ब्रँड वाचवा, अशा आशयाचा एक बॅनर सध्या चर्चेत आलाय. या बॅनरने रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांचं लक्ष वेधलंय. मनसेचे वैभव खेडेकर यांनी हे बॅनर लावलंय. खेडमधील या बॅनरवर ना राज ठाकरेंचाही फोटो लावण्यात आला आहे. कोकणची भूमी निष्ठावंतांची, गद्दारांना ठोका, असं सफेद अक्षरांत लिहिलं गेलंय. तर ठाकरे ब्रँड वाचवा असं, ठळक भगव्या अक्षरांत लिहिलं गेलंय. हा बॅनर सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय.

हे सुद्धा वाचा

आतापर्यंतचे कोकणतील पाच आमदार फोडण्यात शिवसेनेला यश आलंय. यामध्ये एकट्या राजगड जिल्ह्यातील तिन्ही आमदारांचा समावेश आहे. पालघरमधील एक तर सिंधुदुर्गातील दोनपैकी एका आमदाराचा समावेश आहे. या पाच आमदारांमध्ये नेमका कुणाकुणाचा समावेश आहे, त्यावर एक नजर टाकुयात…

  1. महेंद्र दळवी- अलिबाग
  2. महेंद्र थोरवे- कर्जत
  3. भरत गोगावले- महाड
  4. श्रीनिवास वनगा- पालघर
  5. दीपक केसरकर- सावंतवाडी

राजकीय घडामोडींना वेग!

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे मुख्य केंद्र सध्या गुवाहाटी बनली आहे. गुवाहाटीमध्ये शिवसेनेच्या आमदारांच्या मुक्कामाचा आजचा तिसरा दिवस आहे. गुवाहाटीच्या रेडिसन ब्लू हॉटेलात 50 पेक्षा जास्त आमदार असून त्यात शिवसेनेच्या दोन तृतीआंश पेक्षा जास्त आमदारांचा तर काही अपक्ष आमदारांचाही समावेश आहे. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शेवटपर्यंत शिवसेनेला सहकार्य करेल असं सांगण्यात आलंय.

वाचा LIVE घडामोडी : Eknath Shinde vs Shiv Sena LIVE

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.