Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालघर, ठाणे, डोंबिवलीत एकनाथ शिंदेंचे पोस्टर, तर नागपुरात कोणाला समर्थन वाचा

एकनाथ शिंदे हे शिवसेनेशी बंडखोरी करत बाहेर पडले. जरी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असली तरी देखील शिंदे यांच्या भूमिकेला पालघर, ठाणे, डोंबिवलीमधून मोठे समर्थन मिळत आहे. अनेक ठिकाणी त्यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत.

पालघर, ठाणे, डोंबिवलीत एकनाथ शिंदेंचे पोस्टर, तर नागपुरात कोणाला समर्थन वाचा
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 10:25 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत (shivsena) बंडखोरी केली आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या 35 पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने शिवसेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यानंतर बुधवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहान केले. तुम्ही समोर या आणि मला सांगा मी तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून नकोय, मी राजीनामा देतो असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या या भावनिक आवाहानानंतर आता बॅनरबाजीला जोर चढला आहे. पालघर, ठाणे, डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे नागपुरात शिवसैनिकांनी एकत्र येत उद्धव ठाकरेंना समर्थन दिले आहे. तसेच त्यांचे बॅनर देखील लावण्यात आले आहेत.

शिंदेंच्या भूमिकेला समर्थन

हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे यासाठी जवळपास 40 आमदारांसह बंडाचा पवित्रा घेतलेल्या एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला पालघर जिल्ह्यातून मोठ्याप्रमाणात समर्थन मिळताना दिसत आहे.  शिंदे यांच्या समर्थनासाठी पालघर जिल्ह्यातील डहाणू, चारोटी,कासा या परिसरासह मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठया प्रमाणात बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर ” लोकांचा लोकनाथ एकनाथ” आणि ” साहेब आगे बढो हम आप के साथ है” असा मजूकर लिहिण्यात आला आहे. या बॅनरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्यासह एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसैनिक आक्रमक

तर दुसरीकडे नागपुरात मात्र शिवसौनिक आक्रमक झाले असून, ते शिवसेनेच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. सोबत उद्धव ठाकरे यांचे पोस्टर देखील लावण्यात आले आहेत. आम्ही तुमच्या सोबत असल्याचे यावेळी शिवसैनिकांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडील आमदारांची संख्या वाढत असल्याने शिवसेनेसमोरील अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असलेली युती तोडण्यात यावी अशी प्रमुख अट एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसमोर ठेवली आहे. तर दुसरीकडे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शिवसैनिकांना भावनिक आवाहान केले आहे.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.