“आमच्या टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतोच”, सांगलीत जयंत पाटलांच्या पोस्टरची जोरदार चर्चा

जयंत पाटील आणि 'करेक्ट कार्यक्रम' हा शब्द तसा राजकीय पटलावर परिचित आहे. सध्या सांगलीत यावरच जोरदार पोस्टरबाजी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

आमच्या टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतोच, सांगलीत जयंत पाटलांच्या पोस्टरची जोरदार चर्चा
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 7:46 PM

सांगली : महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. जयंत पाटील आणि ‘करेक्ट कार्यक्रम’ हा शब्द तसा राजकीय पटलावर परिचित आहे. जयंत पाटील यांच्या राजकीय डावपेचांची चर्चा कायमच या शब्दप्रयोगासोबत होते. स्वतः जयंत पाटील यांच्याकडूनही ‘करेक्ट कार्यक्रम करतो’ हा शब्दप्रयोग नेहमी होतो. आता पुन्हा एकदा हा शब्दप्रयोग सांगलीत चर्चेचा विषय ठरला आहे. सांगलीत सध्या याच आशयाचे पोस्टर्स झळकले आहेत (Posters of Jayant Patil calling King Maker JRP in Sangli after MLC election victory).

सांगलीतील या पोस्टर्सवर ‘किंग मेकर जे आर पी अर्थात जयंत राजाराम पाटील’ असा मथळा आहे. त्याच्या खालीच “आमच्या टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतोच” असं लिहिण्यात आलं आहे. नुकत्याच पदवीधर आणि शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये महाविकासआघाडीचा दणदणीत विजयी झाला आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणूक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अरुण लाड हे मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यामुळे या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा पुन्हा एकदा किंगमेकर असा उल्लेख होण्यास सुरुवात झाली. जयंत पाटील यांचा किंगमेकर असा उल्लेख करणारे अनेक मेसेज मीडिया आणि सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.

सांगली महापौर निवडणुकीत आघाडीकडून भाजपला चितपट करण्याच्या हालचाली

दुसरीकडे सांगली महापालिकेमध्ये भाजपची सत्ता असली तरी येथे भाजपला काठावरचं बहुमत आहे. दोन महिन्यानंतर महापौरपदाची निवड होणार आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी चमत्कार करणार असल्याची चर्चा आहे. या संपूर्ण राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावाने पोस्टर्स झळकल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकासआघाडीला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळेच आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार पोस्टरबाजी केली आहे. ही पोस्टरबाजी चर्चेचा विषय ठरली आहे. यावर बोलताना राष्ट्रवादीचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणाले, “आघाडीच्या विजयामुळे कार्यकर्त्यांनी पोस्टर लावले असतील.”

हेही वाचा :

‘भाजपने पुण्याची हातातली जागा गमावली तर चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा’

भाजपमध्ये जाण्यासाठी कोणत्या नेत्याशी चर्चा केली ते जाहीर कराच; जयंत पाटलांचं राणेंना आव्हान

गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं; जयंत पाटलांची राणेंवर खोचक टीका

Posters of Jayant Patil calling King Maker JRP in Sangli after MLC election victory

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.