केंद्राच्या पाया पडायला लागलं तरी ठीक, पण…. : जितेंद्र आव्हाड
राज्यात पुढील महिना दोन महिने कोणतीही परीक्षा घेऊ नका. सर्व परीक्षा पुढे ढकला अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.
मुंबई : राज्यात करोनोची स्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. त्यात राज्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सरकारकडे मोठी मागणी केलीय. राज्यात पुढील महिना दोन महिने कोणतीही परीक्षा घेऊ नका. सर्व परीक्षा पुढे ढकला अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. (Postponed all exams for a month, housing Minister Jitendra Awhad’s demand)
MPSC परीक्षेबाबात मागच्यावेळी राजकारण केलं गेलं. ते राजकारण झालं नसतं तर ही वेळ आली नसती. आता राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लागू आहेत. त्यात काही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. घरी जाण्यासाठी पैसे नाहीत. यावेळी परिस्थिती खूपच गंभीर आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की पुढील महिना दोन महिने कोणतीही परीक्षा घेऊ नका, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी विद्यार्थ्यांच्या वतीने मी मा. मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी करतो.#mpscexam #mhuexam
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 8, 2021
एकीकडे MPSCच्या पोरांच्या परीक्षा आहेत. तर दुसरीकडे लस आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनचं राजकारण सुरु आहे. सगळीकडेच महाराष्ट्र राजकारणाचा बळी पडत असेल तर काय करायचं? असा सवाल आव्हाड यांनी केलीय. अशावेळी युद्धात आणि अशा परिस्थितीत राजकारणाला जास्त महत्व देऊ नये. किंबहुना केंद्राच्या पाया पडावं लागलं तरी ठीक, पण लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
परीक्षा घेण्यासाठी आंदोलन आता पुढे ढकलण्याची मागणी
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. एमपीएसी समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना आणि प्रातिनिधीक स्वरुपात सोलापूर, अहमदनगर,सातारा, हिंगोली यवतमाळ, मुंबई, पुणे, लातूर, नागपूर, कोल्हापूर यासह राज्यभरातील विविध शहरातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
राज्य सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाचं कारण देत 14 मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला राज्यभरातील विद्यार्थ्यांनी विरोध केला. यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करुन राज्य सरकारनं 14 मार्चची परीक्षा 21 मार्चला घेण्याचे आणि त्यासोबतचं 11 एप्रिलला होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणं होईल, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जाहीर केले. आता राज्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढल्यानं विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केलीय.
संबंधित बातम्या :
लसीकरणाचा उत्सव जरूर करू, पण आधी लस तर द्या; जयंत पाटलांचा खोचक टोला
Postponed all exams for a month, housing Minister Jitendra Awhad’s demand