Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील सर्वपक्षीय आमदारांचा लेखाजोखा, तुमचा आमदार किती काम करतो? प्रजा फाऊंडेशनचं सर्वेक्षण

अहवालानुसार मुंबई काँग्रेसचे आमदार अमीन पटेल (Amin Patel) (81.43 टक्के) यांनी सर्वात चांगलं काम केलंय. त्यांच्यापाठोपाठ भाजपचे पराग अळवणी (79.96 टक्के) यांचं काम वाखाणण्याजोगं आहे. तर तिसरा क्रमांक शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू (77.19 टक्के) यांचा लागतो.

मुंबईतील सर्वपक्षीय आमदारांचा लेखाजोखा, तुमचा आमदार किती काम करतो? प्रजा फाऊंडेशनचं सर्वेक्षण
प्रजा फाऊंडेशनच्या सर्वेनुसार मुंबईतील टॉप 5 आमदारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 5:18 PM

मुंबई : मुंबईतील आमदारांचं प्रगस्तीपुस्तक प्रजा फाऊंडेशननं (Praja Foundation) एका सर्वेक्षणातून समोर आणलं आहे. प्रजा फाऊंडेशनने मुंबईतील आमदारांचं 2 वर्षाचं रिपोर्ट कार्ड (Report Card) मांडलंय. हा अहवाल आमदारांची विधिमंडळातील उपस्थिती, त्यांनी मांडलेले प्रश्न आणि मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा करुन तयार करण्यात आलाय. या अहवालानुसार मुंबई काँग्रेसचे आमदार अमीन पटेल (Amin Patel) (81.43 टक्के) यांनी सर्वात चांगलं काम केलंय. त्यांच्यापाठोपाठ भाजपचे पराग अळवणी (79.96 टक्के) यांचं काम वाखाणण्याजोगं आहे. तर तिसरा क्रमांक शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू (77.19 टक्के) यांचा लागतो. प्रजा फाऊंडेशनच्या यंदाच्या अहवालात फक्त एका आमदारांला 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.

प्रजा फाऊंडेशनकडून करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात फक्त मुंबईतील 31 आमदारांचा समावेश आहे. मुंबईतील ज्या आमदारांकडे मंत्रिपद होतं त्यांचा या सर्वेक्षणात समावेश नाही. त्यात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, शिवसेनेचे आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे नवाब मलिक, काँग्रेसचे अस्लम शेख, शिवसेनेचे रमेश लटके (मृत) यांच्या कामगिरीची समावेश आहे.

मुंबईतील टॉप 5 आमदार कोणते?

>> अमीन पटेल – काँग्रेस >> पराग अळवणी – भाजप >> सुनील प्रभू – शिवसेना >> अमित साटम – भाजप >> अतुल भातखळकर – भाजप

मुंबईतील कोणत्या 5 आमदारांची कामगिरी सर्वात खराब?

  • रविंद्र वायकर, शिवसेना
  • प्रकाश सुर्वे, शिवसेना
  • राहुल नार्वेकर, भाजप
  • मंगल प्रभात लोढा, भाजप
  • झिशान सिद्दिकी, काँग्रेस

गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या आमदारांमध्ये 27 टक्क्यांनी वाढ

महत्वाची बाब म्हणजे प्रजा फाऊंडेशनने केलेल्या सर्वेक्षणात मागील दोन वर्षात गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या आमदारांमध्ये 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तेराव्या विधानसभेत पहिल्या दोन वर्षात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले 15 आमदार होते. तर चौदाव्या विधानसभेत पहिल्या दोन वर्षात गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या आमदारांची संख्या 19 आहे.

पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा.
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश.
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात.
जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना
जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना.
अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन
अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन.
लातूर मनपा आयुक्त मनोहरेंना एअर अ‍ॅम्ब्यूलन्सने मुंबईत आणणार
लातूर मनपा आयुक्त मनोहरेंना एअर अ‍ॅम्ब्यूलन्सने मुंबईत आणणार.
'पेशंटवर साडेपाच तास उपचारच नाही', चाकणकरांकडून मोठी अपडेट काय?
'पेशंटवर साडेपाच तास उपचारच नाही', चाकणकरांकडून मोठी अपडेट काय?.
गर्भवतीच्या मृत्यूस रुग्णालयच दोषी; रूपाली चाकणकरांनी स्पष्टच सांगितलं
गर्भवतीच्या मृत्यूस रुग्णालयच दोषी; रूपाली चाकणकरांनी स्पष्टच सांगितलं.
'तनिषाची मृत्यूनंतर बदनामी', भिसे कुटुंबीयांचं चाकणकरांना पत्र अन्...
'तनिषाची मृत्यूनंतर बदनामी', भिसे कुटुंबीयांचं चाकणकरांना पत्र अन्....