हिंमत असेल तर अटक करुन दाखवा : प्रकाश आंबेडकर

"अरे हिंमत असेल तर मला अटक करुन दाखवा", असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Aambedkar Protest against CAA and NRC) पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले.

हिंमत असेल तर अटक करुन दाखवा : प्रकाश आंबेडकर
Follow us
| Updated on: Dec 26, 2019 | 4:51 PM

मुंबई : “अरे हिंमत असेल तर मला अटक करुन दाखवा”, असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Aambedkar Protest against CAA and NRC) पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात आज (26 डिसेंबर) नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेसवर टीका (Prakash Aambedkar Protest against CAA and NRC) केली.

“या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्रातील तत्कालीन सरकारनेच पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात माझा समावेश असल्याचा आरोप केला होता. आता हिम्मत असेल तर मला अटक करुन दाखवा”, असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले.

“भाजप, आरएसएस देशात अराजकता माजवत आहे. हा कायदा 40 टक्के हिंदूंविरोधात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने इथल्या भटक्या, आदिवासी, कुणबी तसेच अर्थव्यवस्थेविरुद्ध डफडी वाजवली असती, तर आम्हाला वेगळी डफडी वाजवायला लागली नसती”, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.

“ज्याच्याकडे जमीन त्याच्याकडे कागदपत्र, जमीन नाही त्याच्याकडे कागदपत्र नाहीत, बाप कुठे मेला, पंजोबा कुठे मेला माहित नाही. मग कागदपत्र कसली मागता”, असा सवालही यावेळी त्यांनी भाजप सरकारला विचारला.

“जो यांना विरोध करणार त्याचे नागरिकत्व यांना काढायचे आहे. त्यानंतर हे मताचे अधिकार काढून घेणार. हे विचार करुन जाणीवपूर्वक सुरु आहे. हा कायदा फक्त इथल्या हिंदूंविरोधी असून मुस्लीमविरोधी असल्याचे भासवले जात आहे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“मुंबईतील लोकांसाठी डिटेंशन सेंटर दोन ठिकाणी आहेत. एक खारघरमध्ये आहे, तर दुसरे नेरुळ येथे आहे. खारघरमधील डिटेंशन सेंटरमध्ये कमीत कमी दोन लाख लोक राहतील एवढी मोठी जागा आहे. जे सरकारविरोधी ओरडतील त्यांच्यासाठी हे सेंटर तयार केले आहेत”, असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.