भाजप ‘त्या’ मुद्द्यावर झुकू शकतं, प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेला ट्रिक सांगितली!

शिवसेनेनं आता नमवायला शिकावं, असा सल्ला यावेळी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar advice to Shiv Sena) यांनी सेनेला दिला.

भाजप ‘त्या’ मुद्द्यावर झुकू शकतं, प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेला ट्रिक सांगितली!
Follow us
| Updated on: Nov 01, 2019 | 1:47 PM

पुणे :  “भाजप ही शिवसेनेला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत आहे. बेरोजगारीच्या मुद्द्यावर शिवसेनेनं मुख्यमंत्रिपद पदरात पाडून घ्यावं.  बेरोजगारीच्या मुद्द्यावर भाजप झुकणार”, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar advice to Shiv Sena) यांनी केला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या हेक्यामुळे मुंबईला केंद्रशासित करण्याचं भाजपचं स्वप्न त्यांना बाजूला ठेवावं लागेल. शिवसेनेनं आता नमवायला शिकावं, असा सल्ला यावेळी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar advice to Shiv Sena) यांनी सेनेला दिला.

आम्हाला भाजपची बी टीम म्हणणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मर्यादा पाळावी.  अन्यथा आम्हाला 25 लाख मतं मिळाले आहेत, ते सर्व तुमच्या विरोधात रस्त्यावर उतरतील, असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी आघाडीला दिला.

आम्ही पोलखोल करायला सुरुवात केली तर तुम्हाला जागा राहणार नाही. विविध प्रकरणांची चौकशी काही दिवस लांबवण्यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादी शिवसेनेला पाठींबा देऊ शकते, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच : संजय राऊत 

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असा सूर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कायम ठेवला आहे. ज्यांच्याकडे बहुमत नाही, त्यांनी धाडस करु नये, शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते, असा इशाराही राऊत यांनी दिला. संजय राऊत यांनी पुन्हा पत्रकार परिषद (Sanjay Raut on Shivsena CM) घेत भाजपला आव्हान दिलं.

आम्ही हवेत बोलत नाहीत, आकडे नसताना आमचं सरकार येणार हे आम्ही कधीही म्हटलं नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, हे लिहून घ्या. शिवसेनेने मनावर घेतलं, तर स्थिर सरकारसाठी शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते, असं संजय राऊतांनी दंड फुगवून सांगितलं.

संबंधित बातम्या 

बहुमत सिद्ध करण्याची ताकद, लिहून घ्या, मुख्यमंत्री शिवसेनेचाच : संजय राऊत  

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.