मुंबई : बिहार विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. आरोप प्रत्यारोप आणि आश्वासनांनी जोर धरलाय. अशावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बिहार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारच्या वंचित समाजाला राजकारणात उचित स्थान प्राप्त करुन देण्यासाठी आपण निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर ट्विटरद्वारे जाहीर केलंय. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीनं स्वबळावर नाही, तर प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक आघाडीसोबत दंड थोपटले आहेत. (Prakash Ambedkar’s Vanchit Bahujan Aaghadi will contest Bihar election )
बिहार के वंचित बहुजन समूहों को राजनीति में उचित प्रतिनिधित्व दिलाने के लिए वंचित बहुजन अघाडी Progressive Democratic Alliance के साथ मिलकर चुनाव लड़ रही है।आप से अपिल है इस कार्य में ज्यादा से ज्यादा सहायता करें। आर्थिक सहायता के लिए इस लिंक का उपयोग करें।https://t.co/Cbbh8kDYHa
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) October 13, 2020
‘बिहारमधील वंचित समाज घटकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांना राजकारणात योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक आघाडीसोबत निवडणूक लढवत आहे. आपणाला विनंती आहे की या कार्यात सहकार्य करा,’ अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी बिहारच्या जनतेला आवाहन केलं आहे. राजकारण म्हणजे आज श्रीमंतांची गुलामी बनलं आहे. अनेक मोठे पक्ष श्रीमंतांकडून पैसे घेऊन त्यांच्यासाठीच राजकारण करतात, जे वंचित घटकांच्या हिताचे शत्रू आहेत. त्यामुळं आपली स्वतंत्र ताकद निर्माण करण्यासाठी आणि भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपल्याला स्वत:च्या पायावर उभे राहावे लागेल, असं आवाहनही आंबेडकर यांनी बिहारमधील वंचित घटकांना केलं आहे.
आरक्षण आणि आपलं अस्तित्व अबाधित राखायचं असेल तर आपल्या ऐपतीप्रमाणे जास्तीत जास्त मदत करा. तुमच्या छोट्या योगदानातूनच तुमची मोठी ताकद निर्माण होणार असल्याचं आंबेडकर म्हणाले.
महाराष्ट्रात एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांना सोबत घेत राजकारणात खळबळ माजवून देणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आता बिहार निववडणुकीसाठीही शड्डू ठोकला आहे. अशावेळी बिहारमधील वंचित घटक आंबेडकरांना कसा प्रतिसाद देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं ८ ऑक्टोबर २०२० रोजी निधन झालं. आपल्या राजकीय कारकिर्दीत पासवान बिहारमधील गोरगरीब जनतेचा आवाज बनले होते. मात्र, त्यांच्या निधनामुळं गोरगरीबांचा वाली हरपल्याची भावना बिहारच्या जनतेत निर्माण झाली होती. अशावेळी पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी लोक जनशक्ती पक्षाचं नेतृत्व हाती घेतलं आहे. तेव्हा प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक आघाडीसोबत प्रकाश आंबेडकरांनी केलेली हातमिळवणी आणि बिहारच्या जनतेला केलेलं आवाहन किती कामी येतं?, हे पाहावं लागेल.
काँग्रेस नेते तारिक अन्वर यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. ‘बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए उरली नाही. जनता दल युनायटेड आणि लोक जनशक्ती पक्षातील वाद बिहारची जनता पाहते. यामागे भाजपचा हात आहे. भाजपनं चिराग पासवान यांचा वापर करत आहे’, असा आरोप अन्वर यांनी केला आहे.
नितीश कुमारांना रोखण्यासाठीच भाजपकडून चिराग पासवानचा वापर- तारिक अन्वर
Prakash Ambedkar’s Vanchit Bahujan Aaghadi will contest Bihar election