आरे कॉलनीतील वृक्षतोडीविरोधात मुंबईत वंचितचा महामोर्चा, प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांसह मुंबईकरांना आवाहन
पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या मदतीसाठी आता या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीनेही उडी घेतलीय. आरे कॉलनीतील झाडांची कत्तल रोखण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी 7 ऑगस्टला आंदोलनाची हाक दिली आहे.
मुंबई : मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील (Aarey Colony) हजारो झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा शेकडो झाडं तोडण्यात येत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलाय. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहचलं आहे. अशावेळी पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या मदतीसाठी आता या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीनेही उडी घेतलीय. आरे कॉलनीतील झाडांची कत्तल रोखण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी 7 ऑगस्टला आंदोलनाची हाक दिली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी आरे कॉलनीतील झाडे वाचवण्यासाठी सरकारविरोधातील आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. आरे कॉलनीत सुरू असलेल्या झाडांच्या कत्तलींच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मुंबईत महामोर्चा ! मोठ्या संख्येने सहभागी व्हा!, असं आंबेडकर यांनी म्हटलंय.
आरे कॉलनीत सुरू असलेल्या झाडांच्या कत्तलींच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मुंबईत महामोर्चा ! मोठ्या संख्येने सहभागी व्हा !
रविवारी ७ ऑगस्ट २०२२ वेळ – सकाळी ११ वा. स्थळ – पिकनिक पॉइंट आरे कॉलनी, गोरेगाव#आरे_बचाओ_आंदोलन pic.twitter.com/0nGO5hTvh1
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 5, 2022
प्रकाश आंबेडकरांचं नेमकं आवाहन काय?
आपल्या मुंबईतील कार्यकर्त्यांना कवंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशच्या वतीने गोरेगावमध्ये मेट्रो कारशेड बांधण्याचा घाट जो शासनाने घातला आहे. त्याविरोधात रविवारी आंदोलन आहे. मुंबईतील सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की, आरे हे मुंबईचा ऑक्सिजनचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. हे ऑक्सिजन निर्मिती करणाचा एरिया संपला तर मुंबईत राहणं कठीण होईल अशी स्थिती. त्यामुळे रविवारच्या आंदोलनात मुंबईतील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं असं आवाहन करणारा व्हिडीओ प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
फडणवीसांची भूमिका काय?
आरे संदर्भातील विरोध काही प्रमाणात प्रांजळ आहे आणि काहीप्रमाणात स्पॉन्सर्ड आहे. पर्यावरणवाद्यांचा सन्मान आहे. त्यांचं म्हणणं मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. हरित लवादाने कारशेड करण्यास परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालायनेही परवानगी दिली आहे. तो प्रकल्प सुरू झालेला आहे. 25 टक्के काम पूर्ण झाले आहेत. झाडे कापलेले आहेत. आता झाडे कापण्याची गरज नाही. त्या ठिकाणी काम सुरू केलं तर पुढच्या एक वर्षात काम पूर्ण होईल आणि मेट्रो सुरू होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.