नांदेड, बारामती, माढासह 22 जागा द्या, प्रकाश आंबेडकरांची नवी मागणी

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून भारिपला आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बैठकांवर बैठका होत आहेत. पण भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याचं आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यातच आता प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने 22 जागांची मागणी केली आहे. या 22 जागांवर प्रकाश आंबेडकरांकडून उमेदवारही जाहीर करण्यात आले आहेत. भारिपने ज्या 22 जागा […]

नांदेड, बारामती, माढासह 22 जागा द्या, प्रकाश आंबेडकरांची नवी मागणी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून भारिपला आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बैठकांवर बैठका होत आहेत. पण भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याचं आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यातच आता प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने 22 जागांची मागणी केली आहे. या 22 जागांवर प्रकाश आंबेडकरांकडून उमेदवारही जाहीर करण्यात आले आहेत.

भारिपने ज्या 22 जागा जाहीर केल्यात, त्या 22 जागा हव्यात. त्यात मागेपुढे होऊ शकतं, पण आम्हाला जास्तीत जास्त जागा हव्यात. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट होईल का माहित नाही. पण वंचित बहुजन आघाडीची जास्तीत जास्त जागांची मागणी आहे, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी आघाडीच्या नेत्यांसोबत बैठकीनंतर सांगितलं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी मसुदा द्या, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही बैठकीला उपस्थित होते. आघाडीबाबत सविस्तर चर्चा झाल्याचं ते म्हणाले.

“भारिपने मागितलेल्या 22 जागांमध्ये नांदेड, बारामती आणि माढा यांचाही समावेश आहे. प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याची आमची मनापासून इच्छा आहे. त्यांना अजूनही विनंती करु. त्यांनी या तीन जागा मागितल्या आहेत याचा अर्थ ते चर्चा करायला तयार आहेत. पक्षश्रेष्ठी ठरवतील की मोदी लाटेतही निवडून आलेल्या जागा सोडायच्या किंवा नाही. सुप्रिया सुळे, शरद पवार आणि अशोक चव्हाण यांना निवडणूक लढायची की नाही याचा निर्णय घ्यावा लागेल,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांकडून आघाडीकडे याअगोदर 12 जागांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता 22 जागा द्या ही नवी मागणी करण्यात आल्याने आघाडीच्या नेत्यांचीही डोकेदुखी वाढल्याचं चित्र आहे. विविध जिल्ह्यात सभा घेताना या सभेतच प्रकाश आंबेडकरांनी आतापर्यंत 22 उमेदवार जाहीर केले आहेत. या सर्व जागा आम्हाला सोडव्या, असं त्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे या जागांमध्ये मोदी लाटेतही निवडून आलेल्या जागांचा समावेश आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.