तिहेरी तलाकवर कायदा करता, मग लग्न होऊनही मोदी का नांदत नाही : प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान मोदींवर (PM Modi) जोरदार टीका केली. तीन तलाकवर कायदा केला, पण मोदींनी स्वतः देखील लग्न केलंय, मग ते नांदत का नाही? असा सवाल आंबेडकरांनी मोदींना केला.

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान मोदींवर (PM Modi) जोरदार टीका केली. तीन तलाकवर कायदा केला, पण मोदींनी स्वतः देखील लग्न केलंय, मग ते नांदत का नाही? असा सवाल आंबेडकरांनी मोदींना केला. ते औरंगाबादमध्ये गोर बंजारा समाजाच्या सत्तासंपादन मेळाव्यात बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “नरेंद्र मोदी आपल्याला हुलकावणी देत आहेत. मात्र आपल्यावर त्यांचं थापेबाजीचं राजकारण थोपवण्याची जबाबदारी आहे. वंचितांना हलकेपणाची किंवा श्रेष्ठत्वाची भावना नेहमीच सत्तेपासून दूर ठेवत आली आहे. त्यामुळेच हलकेपणा आणि श्रेष्ठत्व सोडलं पाहिजे.”
‘काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी भ्रष्टाचार केला, त्याचा पाढा संघ आणि भाजपने वाचला’
यावेळी प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपला कधीही तत्त्वे नव्हती. त्यांनी नेहमीच केवळ स्वतःला तत्त्वांचा मुलामा दिला. वर्तमानपत्रांनी त्यांना महत्त्व दिलं. काँग्रेस आणि त्यांच्या पुढाऱ्यांनी भ्रष्टाचार केला. त्याचा पाढा आरएसएस आणि भाजपने वाचला. त्याचाच त्यांना फायदा झाला.”
‘लोकसभेत आम्ही भाजपची ‘बी टीम’ होतो का याचा खुलासा करा’
प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरही सडकून टीका केली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “लोकसभेत आम्ही भाजपची ‘बी टीम’ असतो आणि विधानसभेत आम्हाला सोबत या म्हणता. त्यामुळे आम्ही भाजपची बी टीम (B Team of BJP) होतो का याचा काँग्रेसने आधी खुलासा करावा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्यांचे कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या पक्षात फुट पडत आहे. आम्ही त्यांना 40 जागांची ऑफर दिली होती. आम्ही जोपर्यंत वंचितचे 288 जागांवर उमेदवार जाहीर करत नाही, तोपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीने ही ऑफर कायम असल्याचे समजावे आणि निर्णय घ्यावा.”
यावेळी त्यांनी लोकसभेची निवडणूक वंचित विरुद्ध भाजप होईल, असं वाटत होतं, असंही म्हटलं. तसेच ईव्हीएममुळे तसं होऊ शकलं नाही, असा दावा प्रकाश आंबडेकरांनी केला. ते म्हणाले, ईव्हीएमबाबत आम्ही न्यायालयात जाणार आहोत. न्यायालय म्हणतं ईव्हीएममध्ये घोळ नाही. मात्र, काही ठिकाणी मतदान कमी निघालं, तर काही ठिकाणी जास्त निघालं. याचं उत्तर न्यायालयाला द्यावं लागेल.” तसेच आपली ताकद वाढल्याचं सांगताना एमआयएम आणि आपण कुठेही जाणार नसून सोबत निवडणूक लढवू, असंही आंबेडकरांनी स्पष्ट केलं.