आधी आर आर पाटील, आता जयंत पाटील संभाजी भिडेंच्या बचावाला : प्रकाश आंबेडकर

कोरेगाव भीमा हिंसाचाराचा तपास 'एनआयए'कडे देण्याचा निर्णय निषेधार्ह आणि चुकीचा आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले

आधी आर आर पाटील, आता जयंत पाटील संभाजी भिडेंच्या बचावाला : प्रकाश आंबेडकर
Follow us
| Updated on: Jan 25, 2020 | 12:52 PM

पुणे : संभाजी भिडे यांच्या बचावासाठी आधी माजी गृहमंत्री आर आर पाटील होते, आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar on Jayant Patil) केला आहे. भाजपचं काम काही मंत्रीच करत असल्याचा घणाघातही प्रकाश आंबेडकरांनी केला.

पोलिस अधीक्षकांच्या वतीने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं आहे. संभाजी भिडेंच्या बचावाला जयंत पाटील आहेत ना. पूर्वी आर आर पाटील होते. आता जयंत पाटील आहेत. भाजपचं काम काही मंत्रीच करत आहेत, असं प्रकाश आंबेडकर ‘टीव्ही9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना म्हणाले.

कोरेगाव भीमा हिंसाचाराचा तपास ‘एनआयए’कडे देण्याचा निर्णय निषेधार्ह आणि चुकीचा आहे. तपासातील खोटेपणा उघड होण्याची सरकारला भीती वाटते, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येच्या कटाची चर्चा फक्त टीआरपी वाढवण्यासाठी आहे, असं टीकास्त्रही प्रकाश आंबेडकरांनी सोडलं.

भीमा कोरेगाव तपासावरुन संघर्ष तीव्र, गृहमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांचं उत्तर

केंद्र सरकारचा राज्य सरकारच्या कारभारात हस्तक्षेप होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या या वर्चस्वाच्या लढाईत आरोपींचा बळी जातोय का? याची चिंता वाटत असल्याचंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

भीमा कोरेगाव हिंसाचार हे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र आहे. या प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी केली होती. त्यानंतर चौकशी होणार असल्याची ग्वाही मंत्री नवाब मलिक यांनी दिली होती.

कोरेगाव भीमा दंगलीमागे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र : शरद पवार 

शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानांचे पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये कोरेगाव भीमा प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. या पत्रात पवारांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

“भीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची गरज आहे. कारण देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेचा चुकीचा वापर केला. फडणवीस सरकारने माध्यमांनाही चुकीची माहिती दिली. तसेच पोलिसांच्या मदतीने हे घडविलेले षडयंत्र होते. मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालून जनतेची दिशाभूल करण्याचा डाव होता, असा आरोप पवारांनी केला आहे.

Prakash Ambedkar on Jayant Patil

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.