आरक्षणाच्या मुद्यावर चारही पक्षांकडून फसवणूक,देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांनी रडण्याचं नाटक करु नये : प्रकाश आंबेडकर
आरक्षणाच्या मुद्दयावर राज्यातील चारही पक्ष फसवणूक करतायत असा आरोप वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलाय.
![आरक्षणाच्या मुद्यावर चारही पक्षांकडून फसवणूक,देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांनी रडण्याचं नाटक करु नये : प्रकाश आंबेडकर आरक्षणाच्या मुद्यावर चारही पक्षांकडून फसवणूक,देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांनी रडण्याचं नाटक करु नये : प्रकाश आंबेडकर](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/03/03230044/Prakash-Ambedkar-.jpg?w=1280)
नांदेड : सुप्रीम कोर्टात (Supreme Court) ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील (OBC Political Reservation) अंतरिम अहवाल फेटाळण्यात आला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये आता ओबीसी आरक्षणाच्या जागा आता राखीव खुल्या करुन निवडणुका घ्याव्यात, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आरक्षणाच्या मुद्दयावर राज्यातील चारही पक्ष फसवणूक करतायत असा आरोप वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलाय. नांदेडमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र फडवणीस आणि इतर भाजप नेत्यांनी मगरीचे अश्रू दाखवत रडण्याचे नाटक करू नये. तसेच, तीन पक्षांच्या या सरकारला ओबीसी आरक्षणाचे काही देणंघेणं नाही, असं वक्तव्य आंबेडकर यांनी केल आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले नसून कोणत्या आधारावर देताय त्याचे स्पष्टीकरण मागितले असल्याचे आंबेडकर म्हणालेत. यूक्रेन युद्धावरुन देखील प्रकाश आंबेडकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
आरक्षणाच्या मुद्यावर चारही पक्ष फसवणूक करतात
प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाच्या मुद्यावर चारही पक्ष फसवणूक करतात असं म्हटलंय. देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनी मगरीचे अश्रू दाखवत रडण्याचं नाटक करु नये, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.
यूक्रेन-रशियाबद्दल भारतीय गुप्तचर यंत्रणा अपयशी
यूक्रेन युद्धात अडकलेल्या काही भारतीयांचा जीव गेलाय, त्याला जवाबदार कोण असा सवाल वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विचारलाय. युक्रेन-रशिया युद्धाच्या बाबतीत भारतीय गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरली असा आरोप देखील आंबेडकर यांनी केलाय. आंबेडकर नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेना आणि काँग्रेसला यूतीचा प्रस्ताव
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सोडून आपण कुण्याही पक्षाशी युती करण्यास तयार असल्याचे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलय. काँग्रेस आणि शिवसेनेला तसा प्रस्ताव आपण दिला असल्याचे आंबडेकर यांनी स्पष्ट केलंय.
नवाब मलिक यांनी राजीनामा द्यायला हवा होता
नवाब मलिक यांनी आरोप झाल्यामुळे राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जायला हवे, असे मत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. यापूर्वी देखील देशात अनेकांवर आरोप झाले होते. मात्र,त्या नेत्यांनी राजीनामा दिला होता, अशी आठवण आंबेडकर यांनी करून दिलीय. भाजपला आरक्षण संपवून समान नागरी कायदा आणयाचा आहे अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली, त्याला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी प्रत्युत्तर दिलय. आरक्षण आणि समान नागरी कायद्याचा संबंध आहे का, काहीही वक्तव्य करतात असे वक्तव्य त्यावर आंबेडकर यांनी केलय.
इतर बातम्या :
राज्यपालांना अभिभाषण पूर्ण करु द्यायला हवं होतं, एकनाथ खडसेंनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना फटकारलं
Up Elections 2022 : उत्तर प्रदेशात सातव्या टप्प्यासाठी मतदान, मोदी-योगींची जोडी गड राखणार?