Prakash Ambedkar : टिपू सुलतानच्या मुद्यावर भाजप तोंडघशी पडलंय, पेगाससवरुन ही प्रकाश आंबेडकरांचं टीकास्त्र
वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi ) संस्थापक प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पेगासस (Pegasus) आणि टिपू सुलतान या मुद्यावरुन भाजपवर टीका केली आहे.
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi ) संस्थापक प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पेगासस (Pegasus) आणि टिपू सुलतान या मुद्यावरुन भाजपवर टीका केली आहे. भाजप पेगाससच्या मुद्यावर तोंडघशी पडला आहे. 2017 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेगासस विकत घेतल्याचं वृत्त न्यूयॉर्क टाईम्सकडून देण्यात आलं आहे. पेगाससच्या मुद्यावरुन लक्ष इतरत्र वळवण्यासाठी भाजपकडून टिपू सुलतानचा विषय काढण्यात आला आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. भाजपकडचे सगळे मुद्दे संपलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेगासस 2017 मध्ये विकत घेतल्याचं न्यूयॉर्क टाईम्सनं दिलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारनं पेगासस का विकत घेतलं हे विचारलं पाहिजे होतं, असं म्हटलंय. मात्र, सुप्रीम कोर्टानं तसा प्रश्न विचारला नाही. केंद्रानं पेगासस का घेतलं आणि विकत घेऊन त्यांनी कुठल्या इंडियन इंटेलिजन्स एजन्सीला वापरायला ती दिलेलं आहे, याची विचारणा करायला पाहिजे होती. सुप्रीम कोर्टाने ते केलं नाही, जे कमिशन नेमले ते कमिशन आता काही उत्तरच देत नाही अशी परिस्थिती असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
पाहा व्हिडीओ
पेगाससच्या मुद्यावर भाजप तोंडघशी
प्रकाश आंबेडकर यांनी भाजपकडचे सगळे मुद्दे संपलेत, असं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 मध्ये पेगासस विकत घेतल्याची बातमी न्यूयॉर्क टाइम्सनं बातमी दिली आहे, पेगासस प्रकरणी ट्विट करुन सुप्रीम कोर्टासमोर काही प्रश्न उपस्थित केलं आहे.केंद्र शासनाने पेगासस विकत का घेतलं आणि विकत घेऊन त्यांनी कुठल्या इंडियन इंटेलिजन्स एजन्सीला वापरायला ती दिलेलं आहे याची माहिती देखील समोर आलेली नाही. सुप्रीम कोर्टाने ते केलं नाही. कोर्टानं या प्रकरणी कमिशन नेमले ते कमिशन आता काही उत्तरचं देत नाही, अशी परिस्थिती आहे. सुप्रीम कोर्ट पेगाससच्या मुद्यावर तोंडघशी पडलेलं आहे. याचा अर्थ भाजप तोंडघाशी पडलेली आहे. यामुळे लक्ष वेगळ्या गोष्टीकडे वळवण्याचा प्रयत्न होतोय,असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
टिपू सुलतानच्या मुद्यावरही भाजप तोंडघशी
आता टिपू सुलतानचा मुद्दा आलेला आहे तो अँटी मुस्लिम दृष्टिकोनातून आलेला आहे. भाजपकडे अँटी मुस्लिम शिवाय दुसरा अजेंडा नाही आणि त्यांनी त्याला सुरुवात केलेली आहे. तेव्हा हा मुद्दा फार चालेल मला असं वाटत नाही. टिपू सुलतान आपले राज्य वाचवता वाचवता शहीद झाला अशी परिस्थिती आहे.हा इतिहास लोकांच्या समोर आहे. त्यामुळे टिपू सुलतान ब्रिटिशांच्या विरोधात लढत होता एवढेच सिद्ध झालं आहे. हाच इतिहास आहे,असे लोक मानतात. मुंबईतल्या मालाड येथील गार्डनला टिपू सुलतान याचे नाव देण्याच्या वादावर झालेल्या गदारोळावर स्वत: भाजप तोंडघाशी पडलेलं असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
इतर बातम्या
Mega Block : मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गावर पाच तास मेगा ब्लॉक, कोयना एक्स्प्रेस रद्द
Prakash Ambedkar slam BJP over Tipu Sultan and Pegasus issue