Sujat Ambedkar Video | दंगल पेटवणारे हे उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात; सुजात आंबेडकर यांचा खळबळजनक दावा

राज ठाकरे यांना दंगल पेटवायची असेल तर स्वतःच्या मुलाला आधी रस्त्यावर उतरवा आणि स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवणार नसाल तर बहुजन पोरांनाही उतरवू नका, असा घणाघात सुजात आंबेडकर यांनी केला.

Sujat Ambedkar Video | दंगल पेटवणारे हे उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात; सुजात आंबेडकर यांचा खळबळजनक दावा
सुजात आंबेडकर यांचं राज ठाकरेंना चॅलेंजImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 9:21 PM

औरंगाबाद : मशिदीवरील भोंग्यांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच पेटलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी राज ठाकरेंचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना हनुमान चालिसा म्हणून दाखवण्याचे खुले आव्हान दिले होते. ही घटना ताजी असतानाच सुजात आंबेडकरांनी पुन्हा एकदा मनसेवर टीकास्त्र सोडलं आहे. अमित राज ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणण्यासाठी पर्सनल ईव्हीटेशन दिलं नव्हतं, असं ते म्हणाले. दंगल पेटवणारे हे उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राम्हण असतात आणि रस्त्यावर उतरणारी बहुजन मुलं असतात. राज ठाकरे यांना दंगल पेटवायची असेल, तर त्यांनी स्वतःच्या मुलाला आधी रस्त्यावर उतरवावं आणि स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवणार नसाल तर बहुजन पोरांनाही उतरवू नका, असा इशारा सुजात आंबेडकर यांनी दिला आहे.

सुजात आंबेडकर काय म्हणाले?

अमित ठाकरे यांना स्वतः पर्सनल ईव्हीटेशन दिलं नव्हतं, की तुम्ही येऊन हनुमान चालिसा म्हणा. मेटाफर किंवा पोएट्री आपण म्हणू शकतो, त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा होता, की आपण आतापर्यंत किती दंगली बघितल्या, बाबरी मशिद असो किंवा भीमा कोरेगाव असो, दंगल पेटवणारे हे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राम्हण असतात आणि त्यांच्या वक्तव्यावरुन प्रभावित होऊन प्रत्यक्ष रस्त्यावर उतरणारे हे बहुजन असतात, माझं राज ठाकरेंना एवढंच म्हणणं होतं की तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल, तर बहुजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवा आणि तुम्ही  स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवणार नसाल तर बहुजन पोरांनाही उतरवू नका, असं सुजात आंबेडकर म्हणाले.

माझं वक्तव्य पटल्याचं अनेक जणांनी मला सांगितलं. कितीतरी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. अनेक मुस्लिम बांधव मनसेचा राजीनामा देत बाहेर पडले आहेत. अनेक जणांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याला विरोधही केला आहे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या आदेशानंतर हनुमान चालिसा सुरू, घाटकोपरपासून सुरूवात; मुंबईचं राजकीय वातावरण तापणार?

Sujat Ambedkar: ‘आधी अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा’ सुजातचं चॅलेंज ‘राजपुत्र’ स्वीकारणार?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.