पुणे : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लागू केले आहेत. पण विकेंड लॉकडाऊन सांगत सातही दिवस लॉकडाऊनची स्थिती निर्माण केली जात असल्याचा आरोप सरकारवर करण्यात येतोय. सरकारच्या या निर्णयाला अनेक स्तरातून विरोध होत आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय. (Prakash Ambedkar warns Thackeray government against lockdown)
राज्यातील नागरिक लॉकडाऊनला विरोध करण्याच्या तयारीत आहेत. लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकार कोणतीही मदत करायला तयार नाही. लोकांनी विरोध करण्यापूर्वी राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय परत घ्यावा. सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर अनेक लोक दुकाने सुरु करायला लागतील. तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. सरकारला आम्हाला अटक करायची असेल तर करा. पण आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारला दिलाय.
महाराष्ट्र सरकारच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा प्रसार वाढत आहे. गेल्या वर्षी जे जम्बो कोविड सेंटर सुरुवातीला सरकार चालवत होते. ते नंतर खाबूगिरीसाठी नातेवाईक आणि एनडीओंना चालवायला दिले, अशी घणाघाती टीकाही आंबेडकरांनी राज्य सरकावर केलीय. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक आणि छोटे व्यापारी, व्यावसायिक भरडले जात आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाऊनच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. अन्यथा राजकीय दृष्टीनेच विचार करावा लागेल, असं आंबेडकर यांनी म्हटलंय.
राज्यात विकेंडला दोन दिवस लॉकडाऊन आणि अन्य पाच दिवस कडक निर्बंध लावले जातील असं सरकारकडून सांगण्यात आलं. पण आज सातही दिवस 100 टक्के लॉकडाऊन असल्याचं चित्र राज्यात दिसत आहे. कडक निर्बंध आवश्यक आहेत. पण आता जे निर्बंध घातले गेले आहेत, ते विचार न करता घातले गेलेत. मला 17 असोसिएशनचे लोक आतापर्यंत भेटले. आम्ही कोरोना उपाययोजनांबाबत सरकारला पूर्ण पाठिंबा दिलाय. पण आता कडक निर्बंधांऐवजी सातही दिवस पूर्ण लॉकडाऊन दिसतोय. यामुळे व्यापारी आणि छोटे व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकाची फरफट होत असल्याचं पाहायला मिळतंय. सरकारने यावर चर्चा करुन मार्ग काढावा. अन्यथा उद्रेक होईल, असा सूचक इशाराही फडणवीसांनी राज्य सरकारला दिलाय.
लहान मुलं, युवा आणि गर्भवती महिलांनाही कोरोना, ही लाट जास्त धोकादायक, तज्ज्ञांचा दावाhttps://t.co/UqjC7UJ0k3#CoronaVirus #Corona #CoronaInfection #CoronaPositive #CoronaUpdate
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 7, 2021
संबंधित बातम्या :
‘कोरोना लसींबाबत केंद्राशी बोला, माध्यमांशी बोलून हात झटकणं बंद करा’, फडणवीसांचा खोचक सल्ला
Prakash Ambedkar warns Thackeray government against lockdown