मोदींचे कपडे फाडून संधीचं सोनं करा : प्रकाश आंबेडकर

बुलडाणा: पंतप्रधान मोदींचे कपडे फाडून संधीचं सोनं करा, त्यांना सत्तेतून खाली खेचा, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यापाऱ्यांना केलं. ते बुलडाण्यात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी करुन व्यापाऱ्यांना लुटले. त्यामुळे व्यापार बुडला, असा आरोप करत, प्रकाश आंबेडकरांनी मोदींना सत्तेतून खाली खेचण्याचं आव्हान केलं. “नोटबंदी करताना नोटांवर जर गव्हर्नरची सही आहे, तर नोटांची […]

मोदींचे कपडे फाडून संधीचं सोनं करा : प्रकाश आंबेडकर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

बुलडाणा: पंतप्रधान मोदींचे कपडे फाडून संधीचं सोनं करा, त्यांना सत्तेतून खाली खेचा, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यापाऱ्यांना केलं. ते बुलडाण्यात बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी करुन व्यापाऱ्यांना लुटले. त्यामुळे व्यापार बुडला, असा आरोप करत, प्रकाश आंबेडकरांनी मोदींना सत्तेतून खाली खेचण्याचं आव्हान केलं.

“नोटबंदी करताना नोटांवर जर गव्हर्नरची सही आहे, तर नोटांची सर्व मालकीही गव्हर्नरची असायला हवी. कोणत्याही नोटा बदलून देण्याचे काम हे त्यांचेच आहे. मग मोदींनी नोटबंदी कशी केली? हा अधिकार मोदींना कोणी दिला? असे प्रश्न भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.

नोटबंदी करुन 40 टक्के टॅक्स भरुन घेतल्याने हा एकप्रकारे मोदींनी दरोडाच टाकला, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.

प्रकाश आंबेडकर यांची बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर इथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बळीराम  सिरस्कार यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती. त्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी आघाडी सरकारसह पंतप्रधान मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला केला.

उद्धव ठाकरे म्हणतात की सरकारवर अंकुश ठेवायचे काम ते करतात, तर मग गुजरातच्या हिरे व्यापाऱ्यांना त्यांच्या उद्योगासाठी 1 लाख कोटी रुपयांचं अनुदान कसे दिले? कारण हे सरकार शेतकऱ्यांचे नसून फक्त कारखानदारांचे आहे, असा हल्लाबोल आंबेडकरांनी केला.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.