‘प्रकाश आंबेडकरांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही’

मुंबई: “काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठीच प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार उभे केले आहेत. मात्र त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही”, असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणावर प्रकाशझोत टाकला. यावेळी मुणगेकर यांनी वंचित आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, आले तर प्रकाश […]

‘प्रकाश आंबेडकरांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही’
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

मुंबई: “काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठीच प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार उभे केले आहेत. मात्र त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही”, असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणावर प्रकाशझोत टाकला. यावेळी मुणगेकर यांनी वंचित आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, आले तर प्रकाश आंबेडकर निवडून येतील, असा अंदाज वर्तवला.

भालचंद्र मुणगेकर म्हणाले, “प्रकाश आंबेडकर यांनी 48 जागी उमेदवार दिले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी जे उमेदवार उभे केले आहेत, ते केवळ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी किंवा आघाडीची मतं कमी व्हावी यासाठीच आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या 48 उमेदवारांपैकी प्रकाश आंबेडकर सोडून कोणीही निवडून येणार नाही”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव वापरत प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले राजकारण करत आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताला निवडून देण्याचे आवाहन केले जात आहे, असं मुणगेकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांना न मानणारा मोठा दलित समाज आहे, जो काँग्रेससोबत आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या बहुजन मतांचे विभाजन होणार नाही, असा विश्वास मुणगेकरांनी व्यक्त केला.

आघाडीचे उमेदवार पाडण्यासाठी हे उमेदवार देण्यात आले आहेत. दलित मते ही प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले केवळ यांच्या पाठीशी नाहीत. अनेक दलित संघटना आहेत त्यांच्या मागे दलित मते आहेत.

प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्या राजकीय भूमिका निर्णायक वळणावर आल्यावर निषेधार्ह आहे. रामदास आठवले केवळ दया माया करुन मंत्रीपद मिळविण्याचा कार्यक्रम करत आहेत, असंही मुणगेकर म्हणाले.

“ ही सातरावी निवडणूक आहे.आता पर्यंत झालेल्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक वेगळी आहे. देशातील सर्व पक्ष एका बाजूला आणि नरेंद्र मोदी एका बाजूला अशी परिस्थिती आहे. आधी भाजपसोबत 20 पक्ष होते, मात्र आता केवळ अकाली दल आणि शिवसेना केवळ हेच दोन पक्ष भाजपच्या बाजूने आहे”, असं मुणगेकरांनी निदर्शनास आणलं.

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.