जितेंद्र आव्हाड हे गुगल संशोधक!; ‘त्या’ विधानावरून टीकेची झोड

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आव्हाड आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड हे गुगल संशोधक!; 'त्या' विधानावरून टीकेची झोड
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 2:50 PM

औरंगाबाद : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पण हे उत्तर देत असतानाच त्यांनी एक ट्विट केलं. त्यावरून वाद निर्माण झालाय. आव्हाडांवर टीका केली जात आहे.

जितेंद्र आव्हाड हे गुगल संशोधक आहेत, असं म्हणत मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आव्हाडांवर टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड हे गुगल संशोधक आहेत, अण्णाजी दत्तो यांच्यावर राजद्रोह सिद्ध झाला. म्हणून मारले होते. मनू हा ब्राम्हण नव्हे तर क्षत्रिय होता मनुचा आणि ब्राम्हणांचा संबंध नाही, संभाजी महाराजांना जसं मारलं त्याचा मनुस्मृतीत कुठेही उल्लेख नाही, असंही महाजन म्हणालेत.

आव्हाडांच्या ज्या विधानावरून टीका होतेय ते ट्विट

राष्ट्रवादी हा महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष आहे.काँग्रेस पेक्षा जास्त मतं मुस्लिमांचे राष्ट्रवादीला जास्त मिळतात. अजित पवार किती वाचन करतात हे मला माहित नाही. अजित पवारांना वाटत असावे हिंदू धर्माला जवळचे मानले तर मुस्लिमांची मते मिळणार नाहीत. मुस्लिम मते सांभाळून ठेवण्यासाठी हा खटाटोप आहे. अजित पवारांना एका जातीचं अडवनटेज आहे त्यामुळे ते अशी वक्तव्ये करतात, असं महाजन यांनी म्हटलंय.

मुस्लिम मतांचे लांगुलचालन करण्यासाठी अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय. धर्मवीर म्हणजे नीतिमत्ता आणि कायद्याने वागणारा व्यक्ती. संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्यात काय अडचण आहे?, असा सवाल प्रकाश महाजन यांनी विचारला आहे.

छत्रपती संभाजी महाराजांनी रामसिंग यांना लिहिलेल्या पत्रात औरंगजेबाला यवन पती आहे आणि हिंदूविरोधी होते असं म्हटलं. संभाजी महाराजांनी आजोबा शहाजी भोसले यांना हिंदू धर्म जीर्णोद्धारक तर शिवाजी महाराजांना म्लेच्छ नाशक म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तीन मस्जिदिवर हल्ले केले आहेत, दक्षिण भारतात दोन आणि जालना इथे काद्राबाद इथे मस्जिदित घुसून हल्ला मोडून काढला होता, असंही त्यांनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी वैदिक पध्दतीने राज्याभिषेक करून घेतला. स्वराज्य म्हणजे हिंदूंचे राज्य होते म्हणून संभाजी महाराज धर्मवीर होते. संभाजी महाराजांच्या आधी औरंगजेब ने गोवळकोंडा आणि विजापूर या ठिकाणच्या सुलतानांना कैद केली पण त्यांना मारलं नाही फक्त संभाजी महाराज यांना मारले कारण संभाजी महाराज हिंदू होते, असंही महाजन म्हणाले आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.