‘फडणवीस यांच्यावरील मोठा डाग, शपथविधीत शरद पवार होतेच, मग माघारी का फिरले?’ नेत्याने सांगितलेले 4 बिंदू जुळतायत!!

शरद पवार हे चाणाक्ष नेते आहेत. फक्त 'त्या' एका गोष्टीसाठी शरद पवार माघारी वळाले आणि ते सरकार तीन दिवसात कोसळलं असा दावा प्रकाश महाजन यांनी केलाय.

'फडणवीस यांच्यावरील मोठा डाग, शपथविधीत शरद पवार होतेच, मग माघारी का फिरले?' नेत्याने सांगितलेले 4 बिंदू जुळतायत!!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 5:36 PM

दत्ता कनवटे, औरंगाबादः राजकीय उलथापालथींमध्ये फार प्रसिद्धी झोतात न येणारे तरीही विचारायला गेलं असता अनुभवांतून अत्यंत संयत मत प्रकट करणारे नेते म्हणजे प्रकाश महाजन (Prakash Mahajan). देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून सध्या राजकीय वर्तुळात वक्तव्यांची लाट आलेली असताना अशा एखाद्या अनुभवी व्यक्तीचं मत जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. सत्तेसाठी सुरु असलेल्या या खेळात कोण बरोबर कोण चुकीचं, हे प्रत्येकाचं मत वेगळं असतं. पण ठराविक घटना, राजकीय घडामोडी का घडतात, हे तपासून पाहताना अशा नेत्यांनी दिलेली स्पष्टीकरणं काही बिंदू जुळवणारे ठरतात. त्यानुसार प्रकाश महाजनांनी मांडलेले ४ मुद्दे पाहुयात…

1-सत्तेसाठी कुणीही कुणाबरोबर..

प्रकाश महाजन म्हणाले, ‘ सत्तेसाठी कुणीही कुणाबरोबरही जाऊ शकतं. फडणवीस यांची अप्रकाशित मुलाखत जी नंतर प्रकाशित झाली. त्यात देवेंद्र फडणवीस यांचं एक वाक्य आहे. राज्यपालांना पाठवण्याच्या पत्राचा मसूदा देवेंद्र फडणवीस यांनी तयार केला. म्हणजे हा मसूदा कुठे तरी ठरला होता. तयार फडणवीस यांनी केला.

मोदी आणि पवार यांच्यात दिल्लीत बैठक…

प्रकाश महाजन म्हणाले, ‘ पहाटेचा शपथविधी होण्याआधी पंतप्रधान आणि शरद पवार यांच्यात ४५ मिनिटं बैठक झाली, त्यात काय ठरलं? फडणवीस असा दावा करतात की पहाटेचा शपथविधी शरद पवारच्या सांगण्यावरून झाला.

हे अजित पवारांचं बंड असेल तर शऱद पवार यांनी अजित पवार यांना बोलावून उपमुख्यमंत्री पद, अर्थखातं का दिलं? अजितदादांची एक अतृप्त इच्छा गृहखात्याची होती. ती फक्त पूर्ण केली नाही.

2- शरद पवार माघारी का वळाले?

पहाटेच्या शपथविधीत शरद पवार यांची संमती होती, हे स्पष्ट होतंय. आता ते यातून माघारी का वळाले, हा प्रश्न आहे. प्रकाश महाजन म्हणातात, राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक गट यांनी शरद पवारला पटवून दिलं. पावसात भिजून, आयुष्यभर जे कमावलं ते अशा शपथविधीतून गमावू शकतं…

शरद पवारसारखा चाणाक्ष, विचार करणाऱ्या माणसानं विचार केला असेल. एक डाग १९७८ चा गेली ४० वर्ष आपण शरीरावर घेतोच आहोत. मग हा घ्यायचा का… त्या एका गोष्टीसाठी शरद पवार माघारी वळाले आणि ते सरकार तीन दिवसात कोसळलं..

3- पवार आणि मोदींमध्ये काय चर्चा?

या शपथविधीसाठी शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या दरम्यान काय चर्चा झाली होती? त्यातले करार शऱद पवार यांनी मोडले का.. असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पण चर्चेत काय झालं, हे कधीच बाहेर आलं नाही. पण एक गोष्ट जाणवली. पवार म्हणाले… देवेंद्र सारखा सुसंस्कृत माणूस असा असत्याचा आधार घेऊन वागेल, असं वाटत नाही..

दोन माणसांनी चर्चा करून हे केलं असेल आणि फडणवीस त्याबद्दल बोलले.. त्यामुळे पवार असं म्हणत असतील याचा अर्थ तेव्हा या दोघांमध्ये नक्की काहीतरी घडलं होतं.

शिवसेनेनी भाजपला धोका दिला. यात काहीतरी घडलं. शिवसेनेला धडा शिकवायचा म्हणून फडणवीस राष्ट्रवादीसोबत गेले.

4- ‘राष्ट्रवादीसोबत जाणारा एक गट भाजपमध्ये’

त्याही पुढे जाऊन प्रकाश महाजन म्हणाले, ‘भाजपमध्येही एक गट आहे. जो पवार साहेबांच्या सोबत जावं, अशा मताचा होता. त्यांना गोपीनाथ मुंडे यासाहेबांचा अडथळा होता. त्यामुळेही हा शपथविधी झाला.

पण १९७८ ची घटना जशी शरद पवार यांच्या कपड्यावर डाग म्हणून राहिली. तसा पहाटेचा शपथविधी हासुद्धा देवेंद्रच्या कारकीर्दीवरचा डाग आहे. तो ते मिटवू शकणार नाहीत.

दुसरा धोका कसा असू शकतो?

उद्धव ठाकरे यांनी धोका दिला. पण दुसरा धोका अजित पवार यांनी दिला, असं फडणवीस म्हणाले. याचा अर्थ मुख्यमंत्री पदाचा मोह असाच होतो. एकदा ठेच खाल्ल्यावर माणूस खाली पाहून चालतो. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा माणूस असं कसं करू शकतो? हा प्रश्न प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला.

मग शिंदेंचं सरकारही अनैतिक?

पहाटेचा शपथविधी अनैतिक होता तर शिंदे यांचा शपथविधीही अनैतिक आहे का, असं बोललं जातंय. यावर प्रकाश महाजन म्हणाले, ‘ भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीच सांगितलं. अनैतिक सरकार आहे. आम्ही काय सांगणार? मविआ सरकार बाळासाहेबांच्या विचारांनी चालणार नाही, असं शिंदे म्हणतात. मग २ वर्ष मंत्रिपद कसं उपभोगलं? आमच्यासारख्या जनतेला हे कळत नाही की, सत्तेसाठी कोण कुणाच्या पाठित सुरा खुपसतं? प्रत्येकजण सहानुभूतीसाठी पाठ दाखवतं.. प्रत्येकावर वार आहे.

७८ ची घटना जशी शरद पवार यांना सोडत नाही, तसा पहाटेचा शपथविधी देवेंद्र फडणवीस यांची आणि एकनाथ शिंदे यांचा आताचा शपथविधी हे तीन आरोप या नेत्यांची पाठ सोडणार नाहीत. कितीही पुण्य करून ते डाग धुण्याचा प्रयत्न केला तरी तो जाणार नाही. यातून जनतेच्या हाती काही पडलं नाही, हे निश्चित, असं वक्तव्य प्रकाश महाजन यांनी केलंय.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.