शंकराचार्यांऐवजी राज ठाकरेंची पाद्यपूजा करा; प्रकाश महाजन यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मनसे नेते प्रकाश महाजन यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे आणि शंकराचार्यांच्या भेटीवरून हा हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे यांनी शंकाराचार्यांची नव्हे तर राज ठाकरेंची पाद्यपूजा केली पाहिजे, असा टोला प्रकाश महाजन यांनी लगावला आहे.

शंकराचार्यांऐवजी राज ठाकरेंची पाद्यपूजा करा; प्रकाश महाजन यांचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 26, 2024 | 3:00 PM

मनसे नेते प्रकाश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी शंकराचार्यांची पाद्यपूजा करण्याऐवजी राज ठाकरे यांची पाद्यपूजा केली पाहिजे. कारण राज ठाकरे हे विज्ञानवादी नेते आहेत, असं सांगतानाच आचार्य अत्रे असते तर गेल्या दहा हजार वर्षात असा हिंदू नेता जन्मला नाही, असं राज ठाकरेंबद्दल म्हणाले, असते. प्रबोधनकार ठाकरे असते तर त्यांना आपल्या नातवाबद्दल अभिमान वाटला असता, असा टोला प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

प्रकाश महाजन यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. मनसेच्या मेळाव्यात काल राज ठाकरे यांचं भाषण झालं. हे भाषण प्रकाश महाजन यांना बघता आलं नाही. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. दुर्देवाने मी प्रत्यक्षपणे भाषण ऐकू शकलो नाही. नंतर मी भाषण पाहिलं. ते भाषण ऐकून मला अधिकच उत्साह आला. आता तिसऱ्या पर्यायाच्या दृष्टीने राज ठाकरे निघाले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीनंतर आता तिसरा पर्याय राज्यातील जनतेला हवा आहे, असं प्रकाश महाजन म्हणाले.

50 वर्षात असा विचार झाला नाही

राज ठाकरे यांनी जो महाराष्ट्र बघितला तो अजून अस्तित्वात यायचा आहे. त्यांनी त्यात पर्यावरणाचा विचार केला आहे, येणाऱ्या दिवसाच्या विचार केला आहे आणि प्रगतशील राष्ट्रचा देखील विचार केला आहे. खरं म्हणजे हिंदूंना विज्ञानाचा दृष्टिकोन ठेवून हिंदुत्व शिकवणारा नेता मिळाला आहे. गेल्या 50 वर्षात असा विचार कोणीच मांडला नाही. राज ठाकरे यांचे हिंदुत्व जुन्या रूढी परंपरा घेऊन चालणारं नाही, नव्या विचारांना वाव देणारं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

राज कमकुवत नाही

महाराष्ट्रा विषयी त्यांच्या काही कल्पना आहेत. त्यांना एक संधी मिळायला पाहिजे. त्यामुळेच आम्ही ठरवलं की एक प्रयत्न करू. विज्ञानवादी हिंदुत्वावर आज राज ठाकरे हेच खरे ठरले आहेत. राज ठाकरे जरी आज जन्माला आले असले तरी ते 100 वर्षे पुढचा विचार करतात. यावेळी महाराष्ट्राचे प्रश्न मांडून आम्ही जनतेकडे मत मागू. राज ठाकरे कमकुवत नाहीत. त्यांच्या सारखा हुकमी एक्का आमच्याकडे आहे, असंही ते म्हणाले.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.