कोरोनाचा प्रकोप, कित्येक जणांचं संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित, देवेंद्रजी, आता आपणच शासनाला मार्गदर्शन करा : प्रकाश मेहता
माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाच्या काळात देवेंद्रजी आपणच शासनाला मार्गदर्शन करा, अशी विनंती केली आहे. | Prakash Mehta Facebook Post
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप सुरु आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोनाचे रुग्ण प्रचंड वाढतायत. अशा वेळी राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून देवेंद्रजी आपणच शासनाला मार्गदर्शन करा, अशी विनंती केली आहे. (Prakash Mehta request to Devendra Fadnavis through Facebook post over increasing Corona Cases)
कोरोनाची भीषण परिस्थिती सुरु आहे. कित्येक जणांचं संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित आहे. कित्येकांची कुटुंबची कुटुंब रुग्णालयात आहेत. हे सगळं वेळीच थांबवण्यासाठी तुम्ही कृपया सकारात्मक मार्ग निघेल यासाठी शासनाला योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी विनंती फेसबुक पोस्ट लिहून प्रकाश मेहता यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
प्रकाश मेहता यांंनी फेसबुक पोस्टमधून काय म्हटलंय…?
“देवेंद्रजी सप्रेम नमस्कार… कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात वाढला आहे. घाटकोपर मध्ये आज सर्वाधिक ३२७ रूग्ण पॉजिटिव निघाले आहेत. स्थानिक रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी जागा रिकाम्या नाहीत. परत पूर्ण लॉकडाऊन करायची वेळ येणार आहे की काय असे वाटू लागले आहे. आता तर कित्येकांचे संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित असून एकाच रुग्णालयात उपचार घेताना आधळून येत आहेत”.
“पती, पत्नी, मुलगा, सूनबाई एकाच रुग्णालयात पण वेगवेगळ्या वॉर्ड मध्ये दाखल होताना दिसत आहेत. त्यामुळे हे सगळे वेळीच थांबवण्यासाठी तुम्ही कृपया सकारात्मक मार्ग निघेल यासाठी शासनाला योग्य ते मार्गदर्शन करावे ही विनंती करतो”.
माननीय @Dev_Fadnavis जी, सप्रेम नमस्कार कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात वाढला आहे. घाटकोपर मध्ये आज सर्वाधिक ३२७ रूग्ण पॉजिटिव निघाले आहेत. स्थानिक रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी जागा रिकाम्या नाहीत.
— Prakash Mehta (@bjpprakashmehta) March 25, 2021
परत पूर्ण लॉकडाऊन करायची वेळ येणार आहे की काय असे वाटू लागले आहे. आता तर कित्येकांचे संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित असून एकाच रुग्णालयात उपचार घेताना आधळून येत आहेत. पती, पत्नी, मुलगा, सूनबाई एकाच रुग्णालयात पण वेगवेगळ्या वॉर्ड मध्ये दाखल होताना दिसत आहेत.
— Prakash Mehta (@bjpprakashmehta) March 25, 2021
त्यामुळे हे सगळे वेळीच थांबवण्यासाठी तुम्ही कृपया सकारात्मक मार्ग निघेल यासाठी शासनाला योग्य ते मार्गदर्शन करावे ही विनंती करतो.
— Prakash Mehta (@bjpprakashmehta) March 25, 2021
महाराष्ट्रात सध्या कोरोनाची परिस्थिती काय?
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह अनेक मोठ्या शहरात कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढतोय. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारकडून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तसे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
राज्यात गुरुवारी 35 हजार 952 नवे कोरोना रुग्ण
राज्यात गुरुवारी दिवसभरात 35 हजार 952 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. गुरुवारी दिवसभरात 20 हजार 444 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर दिवसभरात 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण 2 लाख 62 हजार 685 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.78% झाले आहे. आतापर्यंत एकूण 22 लाख 83 हजार 037 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या 13 लाख 62 हजार 899 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 13 हजार 770 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
(Prakash Mehta request to Devendra Fadnavis through Facebook post over increasing Corona Cases)
हे ही वाचा :