‘चाणक्य’ प्रशांत किशोर यांनी चंद्राबाबूंची सत्ता उलथवली!
हैदराबाद : राजकीय चाणक्य आणि निवडणूक रणनीतीकार अशी ओळख असलेले प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा आपलं पांडित्य दाखवून दिलं आहे. त्यांच्या काटेकोर नियोजनामुळे आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसने चंद्राबाबू नायडूंची सत्ता उलथवून लावली आहे. आंध्र प्रदेशात लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभेच्याही निवडणुका झाल्या. यामध्ये प्रशांत किशोर यांनी जगनमोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेससाठी काम केलं. त्याचा परिणाम म्हणून […]
हैदराबाद : राजकीय चाणक्य आणि निवडणूक रणनीतीकार अशी ओळख असलेले प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा आपलं पांडित्य दाखवून दिलं आहे. त्यांच्या काटेकोर नियोजनामुळे आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसने चंद्राबाबू नायडूंची सत्ता उलथवून लावली आहे. आंध्र प्रदेशात लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभेच्याही निवडणुका झाल्या. यामध्ये प्रशांत किशोर यांनी जगनमोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेससाठी काम केलं. त्याचा परिणाम म्हणून वायएसआर काँग्रेसने आंध्र प्रदेशात सत्ता काबीज केली.
आंध्र प्रदेश विधानसभेच्या 175 जागांपैकी वायएसआर काँग्रेसला तब्बल 151 जागा मिळाल्या. तर लोकसभेच्या 25 जागांपैकी तब्बल 23 जागी विजय मिळवला. त्यामुळे आंध्र प्रदेशात सत्ताधारी चंद्राबाबू नायडूंचा सूफडासाफ झाला.
यानिमित्ताने निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. प्रशांत किशोर यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी रणनीती आखली होती. त्यानंतर त्यांनी विविध राज्यासांठी कामं केली. किशोर यांनी 2017 मध्येही उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेससाठी काम केलं होतं. पण त्यावेळी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात अपयश आलं होतं. आता या निवडणुकीतही प्रशांत किशोर यांनी आपली उत्तम कामगिरी बजावत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे.
प्रशांत किशोर यांच्या कामगिरीमुळे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना सत्तेतून बाहेर पडावं लागलं आहे.
जगनमोहन रेड्डी यांनी हैदराबाद येथील आपल्या निवासस्थानी प्रशांत किशोर यांच्यासोबत निवडणूक निकाल पाहिला. त्यांच्या पक्षाने राज्यात 25 पैकी 23 लोकसभा आणि 175 पैकी 150 विधानसभा जागांवर विजय मिळवला. वायएसआर काँग्रेस राज्यात यापूर्वीही सत्तेत होती. लोकसभेत भाजप आणि काँग्रेसनंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून वायएसआरचा नंबर लागू शकतो.
Thank you Andhra and colleagues at @IndianPAC for the landslide victory. Congratulations and best wishes to the new CM @ysjagan
— Prashant Kishor (@PrashantKishor) May 23, 2019
आंध्र प्रदेशचा निकाल लागल्यानंतर प्रशांत किशोर यांनी आयपीसी (इंडियन पॉलिटिकल अॅक्शन) चा रिपोर्ट देते ट्वीट केले आहे. ट्वीटमध्ये किशोर यांनी म्हटलं आहे की, “आंध्रप्रदेश आणि सर्व सहकाऱ्यांच्या एकतर्फी विजयाबद्दल शुभेच्छा, नवीन मुख्यमंत्र्यांनाही खूप खूप शुभेच्छा”.
आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाला मोठं यश मिळाल्याने प्रशांत किशोर यांना इतर पक्षाकडूनही मोठी मागणी होत आहे. प्रशांत किशोर यांनी गेले दोन वर्ष जगनमोहन रेड्डी यांच्यासोबत काम केलं आहे. तसेच 175 जागांवरील प्रत्येक जागेवर त्यांनी अभ्यास केला आणि निवडणूक प्रचार केला. यामुळे वायएसआरला मोठे यश मिळाले.