मला उत्तरप्रदेशातल्या उन्नावमध्ये मला भीती वाटली, कारण तिथे योगी सरकार आहे – प्रणिती शिंदे
परवा मी उत्तरप्रदेशात (Uttar Pradesh) होती. उन्नाव (Unnao) तुम्हाला नाव माहिती असेल. भीती वाटली मला तिथं जाण्यास का तर योगी सरकार आहे म्हणून, महाराष्ट्रात आम्ही इकडे येतो. रात्री सभेला बसतो, ताट मानेने आम्ही सभेला येतो. तिथे असं नाही, तिथे उमेदवाराला सुध्दा बोलता येत नाही. कारण तिथे जी घटना घडलेली तिच्या आईला उमेदवारीचं तिकीट दिलं होतं.
कोल्हापूर – परवा मी उत्तरप्रदेशात (Uttar Pradesh) होती. उन्नाव (Unnao) तुम्हाला नाव माहिती असेल. भीती वाटली मला तिथं जाण्यास का तर योगी सरकार आहे म्हणून, महाराष्ट्रात आम्ही इकडे येतो. रात्री सभेला बसतो, ताट मानेने आम्ही सभेला येतो. तिथे असं नाही, तिथे उमेदवाराला सुध्दा बोलता येत नाही. कारण तिथे जी घटना घडलेली तिच्या आईला उमेदवारीचं तिकीट दिलं होतं. त्यांच्या सभेला तीनशे पोलिस होते. तिथे सभेला सुरक्षेसाठी असं वातावरण आहे. एक मिनिटासाठी विचार करा जर संपुर्ण देशात असं घडलं. तर या महाराष्ट्राचा तरूण मुलगा काय तोंड दाखवणार आहे. तुमच्या माय माऊलीचा आदर करणं तुमच्या हातात आहे असं म्हणून आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी भाजपवरती टीका केली.
भाजपाने माणुसकी दाखवायला हवी होती
आमदार शिंदे यांच्यासह आमदार रोहित पवार, आमदार धीरज देशमुख, शिवसेना युवासेना सचिव वरुण सरदेसाई, आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थित युवा मेळावा पार पडला. त्यावेळी प्रणिती शिंदे यांनी भाजपाच्या धोरणावरती सडकून टीका केली. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रचारासाठी त्या कोल्हापूरात आल्या आहेत. काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्यावर माजी खासदार धनंजय महाडीक यांनी केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार उत्तर दिलं. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर तिथं भाजपाने माणुसकी दाखवायला हवी होती. तसेच कोल्हापूरची निवडणूक बिनविरोध करायला हवी होती असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या.
चंद्रकांत पाटलांची खिल्ली उडवली
कोल्हापूरातील मतदारांना पेटीएमच्या माध्यमातून पैसे वाटप करण्याचं काम सुरू आहे. ज्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील. अशा लोकांची ईडी चौकशी लागेल असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य म्हणजे त्यांच्या सांगण्यावरून ईडी काम करते हे मान्य केले आहे अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे.