मुंबई महापालिकेवर भाजपचा इंजेक्शन घोटाळ्याचा आरोप, प्रसाद लाड यांचा शिवसेनेला सवाल

म्हाडाच्या घरात कोण घुसलंय त्याबाबत रितसर चौकशी करावी. शिवसेनेच्या माध्यमातून घुसखोरांना घरं दिली गेली असतील तर या दोन पक्षांमध्ये समन्वय नाही का? असा प्रश्न लाड यांनी विचारला आहे.

मुंबई महापालिकेवर भाजपचा इंजेक्शन घोटाळ्याचा आरोप, प्रसाद लाड यांचा शिवसेनेला सवाल
प्रसाद लाड, भाजप आमदार
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 3:45 PM

मुंबई : भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मुंबई महापालिकेवर इंजेक्शन घोटाळ्याचा आरोप केलाय. महापालिकेनं कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोनोक्लोनल इंजेक्शन मागवले होते. हे एक इंजेक्शन 1 लाखाचं आहे. असे 200 इंजेक्शन वाया गेले. पण आता पुन्हा 60 कोटी रुपयांचे इंजेक्शन मागवण्यात आले आहेत. हे इंडेक्शन गरज नसताना का मागवण्यात आले? असा सवाल प्रसाद लाड यांनी मुंबई महापालिकेला केलाय. (Prasad Lad accuses Mumbai Municipal Corporation of injection scam)

जितेंद्र आव्हाडांना टोला

त्याचबरोबर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाबद्दल ट्विट न करता पोलीसांकडे तक्रार दाखल करावी. म्हाडाच्या घरात कोण घुसलंय त्याबाबत रितसर चौकशी करावी. शिवसेनेच्या माध्यमातून घुसखोरांना घरं दिली गेली असतील तर या दोन पक्षांमध्ये समन्वय नाही का? असा प्रश्न लाड यांनी विचारला आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी ‘म्हाडाच्या ट्रांझिट कॅम्पमध्ये होणारी घुसखोरी ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे. कुणीही येतं आणि कुणाच्याही घरात घुसतं. ‘जिसकी लाठी उसकी भैस’ अशा पद्धतीने घरे बळकावली जातात. मी म्हणजे तेथील रेंट कलेक्टर, तेथील म्हाडाचे अधिकारी आणि तेथील पोलिस अधिकारी हे सगळे या प्रकरणात सामिल आहेत. गरीब माणसाने जगायचं कस. ह्यावरती काहीतरी कठोर कारवाई करावीच लागेल. ज्याच हक्काच घर आहे त्याला त्याच घर मिळायलाच हवं. घुसखोर कोणिही असो त्याला घरातून काढून कायद्याच्या कचाट्यात अडकवून जेलमध्ये टाकायला हवं’, असं ट्वीट केलं होतं. त्यावरुनच लाड यांनी आव्हाडांना टोला लगावलाय.

प्रसाद लाडांचा शिवसेनेला इशारा

दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी डिसेंबरमध्ये भाजपचे 15 ते 20 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगत एकच खळबळ उडवून दिली आहे. मात्र, यशवंत जाधव दिशाभूल करत आहेत. महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यांना एवढंच सांगेन की आमचे 15 ते 20 दाखवत राहाल आणि तुमचेच 15-20 नगरसेवक कधी आमच्या गळाला लागतील हे तुम्हालाही कळणार नाही, असा इशाराच लाड यांनी जाधवांना दिलाय.

यशवंत जाधवांचा दावा काय?

डिसेंबरमध्ये मुंबईत राजकीय भूकंपाचे संकेत जाधव यांनी दिले आहेत. भाजपचे 15 ते 20 नगरसेवक शिवसेनेते प्रवेश करणार आहेत. पक्ष नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळलेले नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे. ‘मी एक सांगतो आहे की, मुंबई महापालिकेत असलेले भाजपचे काही नगरसेवक निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाला कंटाळले आहेत. नेतृत्वाचा मनमानी कारभार, त्यांना कुठेही विचारात न घेणं, त्यांना डावलणं, यातून त्यांची निराशा होत आहे. परिणामी अशी मंडळी निश्चितपणे वेगळा विचार करत आहेत. त्याचा जो निकाल आहे तो डिसेंबरला मुंबई शहराला कळेल. भाजपची ही मंडळी शिवसेनेच्या संपर्कात आहेत. जे नेतृत्व आहे ते त्यांना जुमानत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचा आधार वाटतोय’, असा दावा यशवंत जाधव यांनी केलाय.

इतर बातम्या :

मुंबई महापालिका कर्मचारी, पोलिसांविरोधात किरीट सोमय्यांची तक्रार, अधिकाऱ्यांच्या अटकेची मागणी

‘मिशन कवचकुंडल’ अभियान दिवाळीपर्यंत चालू राहणार, लसीकरणाचा वेग वाढवणार- आरोग्यमंत्री

Prasad Lad accuses Mumbai Municipal Corporation of injection scam

'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.