आधी शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत प्रसाद लाड यांचं आक्षेपार्ह वक्तव्य, आता माफीनामा, म्हणाले…
प्रसाद लाड यांच्या दिलगिरी...
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या बाबत सातत्याने आक्षेपार्ह वक्तव्य केली जात आहेत. आधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मग भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यानंतर भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी छत्रपतींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केली. त्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला गेला. सगळीकडूनच टीकेची झोड उठल्यानंतर प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
शिवरायांबाबतच्या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर प्रसाद लाड यांनी आज दिलगिरी व्यक्त करतो, असं प्रसाद लाड म्हणालेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर त्याची मी दिलगिरी व्यक्त करतो. माफी मागतो, असं प्रसाद लाड म्हणाले आहेत.
प्रसाद लाड यांचं वादग्रस्त वक्तव्य
“हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. रायगडावर शिवरायांचं बालपण गेलं आणि याच रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली”, असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं. त्यानंतर लाड यांच्यावर चहूबाजूने टीका झाली.
आधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली आहे. त्यानंतर कोश्यारी यांच्या हकालपट्टीची मागणीसाठी राज्यभर निदर्शनं केली जात आहेत. अशातच एकामागोमाग एका भाजप नेत्याकडून वादग्रस्त विधानं केली जात आहेत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, राज्यातील मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यानंतर आता प्रसाद लाड यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं.त्यानंतर माफीची मागणी केली जात होती. आज लाड यांनी माफी मागितली आहे.