मी नगरची निवडणूक लढणार नाही, प्रशांत गडाख यांचं जाहीर स्पष्टीकरण

अहमदनगर : राष्ट्रवादीकडून अहमदनगरची जागा काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंसाठी न सोडण्यात आल्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला. या जागेवर राष्ट्रवादी माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत गडाख यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती. पण मी निवडणूक लढणार नाही, असं प्रशांत गडाख यांनी जाहीर केलंय. विखे आणि गडाख हा वाद नगरमध्ये […]

मी नगरची निवडणूक लढणार नाही, प्रशांत गडाख यांचं जाहीर स्पष्टीकरण
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

अहमदनगर : राष्ट्रवादीकडून अहमदनगरची जागा काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंसाठी न सोडण्यात आल्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला. या जागेवर राष्ट्रवादी माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत गडाख यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती. पण मी निवडणूक लढणार नाही, असं प्रशांत गडाख यांनी जाहीर केलंय. विखे आणि गडाख हा वाद नगरमध्ये जुना आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खेळी खेळणार असल्याचं बोललं जात होतं. अखेर प्रशांत गडाख यांनीच यावर स्पष्टीकरण दिलंय.

काय आहे विखे विरुद्ध गडाख वाद?

शरद पवार आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्यात अनेक वर्षांपासून संघर्ष चालत आला होता आणि त्यांच्यात दोन गट होते. पण 1991 च्या लोकसभा निवडणुकीत हा वाद खऱ्या अर्थाने पेटला. या निवडणुकीत नगर दक्षिणची जागा बाळासाहेब विखेंना टाळून काँग्रेसने यशवंतराव गडाख यांना दिली होती. अर्थात शरद पवारांनीच ही जागा गडाखांना मिळावी यासाठी जोर लावल्याचं बोललं जातं. बाळासाहेब विखे पाटील अपक्ष म्हणून निवडणूक लढले. या निवडणुकीत बाळासाहेब विखेंचा पराभव झाला. पण स्वतःच्याच जिल्ह्यात झालेला हा पराभव बाळासाहेब विखेंच्या जिव्हारी लागला होता.

बाळासाहेब विखेंनी आचारसंहितेचा धागा पकडत विजयी उमेदवार यशवंतराव गडाख यांच्याविरोधात तक्रार केली. या निवडणुकीत जात आणि धर्माच्या आधारावर मतं मागितली गेल्याचा त्यांनी आरोप केला. बाळासाहेब विखेंनी या प्रकरणी पुरावे जमा केले, प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि आरोपी होते यशवंतराव गडाख, तर सहआरोपी म्हणून शरद पवारांचं नाव होतं. शरद पवार या प्रकरणातून यशस्वीरित्या बाहेरही पडले होते.

प्रशांत गडाख यांचं स्पष्टीकरण जसंच्या तसं

गेल्या अनेक दिवसांपासून विविध वर्तमानपत्रांमधुन आणि जनमाणसांमधून मी लोकसभेचा उमेदवार असणार या चर्चा झाल्या. आदरणीय गडाख साहेबांवर व माझ्यासारख्या छोट्याशा व्यक्तीवर एवढं प्रेम आहे याची यातनं मला प्रकर्षाने जाणीव झाली. माझ्या कुटुंबातील प्रत्येकांनीमी लढावं हे सांगितलं. खरं म्हणजे निवडणुक हे एकप्रकारचं युध्द समजल जातं, दोन मोठी कुटुंब लढणार आणि युध्द होणार अश्या चर्चाही त्यामुळे घडत असतात. आणि त्या स्वाभाविकही असतात. पण मला अशा युध्दातकधीच इंटरेस्ट वाटला नाही, का कोण जाणे…

राजकारण हे चांगलं की वाईट क्षेत्र आहे यावरखुप चर्चा होवु शकतात. पण आज मला हे निश्चितच जाणवलं की, हे क्षेत्र खुपच असंवेदनशील झालेलं आहे. आणि मग मी त्यात का पडावं, हे मानसिक द्वंदमाझं सुरु आहे.

मला माझे मित्र, सर्व पक्ष, संघटना, कार्यकर्तेआणि सर्वसामान्य समाज या सगळ्यांकडनं लोकसभा लढवण्याचा आग्रह झाला. पण मी सध्या तरी राजकारणात न पडण्याचा निर्णय घेत आहे. पराभव व विजय मी याचा कधीच विचार केला नाही. कारण पराभव काय आणि विजय झाला काय तो नवनिर्मितीचा असला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे.

माझ्या मनातल्या या सगळ्या वैचारिक घुसळणीतुन आज मी एक निर्णय घेतलायं, संपुर्ण अहमदनगर जिल्ह्यासाठी मला एक व्हिजन तयारकरायचं आहे. त्यात शेती व पिण्याच्या पाण्याचे प्रश्न,आरोग्य, वीज, शिक्षण, अध्यात्म, सामाजिक स्वास्थ,रोजगार, कला, साहित्य, क्रीडा, पर्यटन, जुनी पिढी,वाचन संस्कृती या सगळ्या बाबतीत पुढच्या २५ ते ३०वर्षांचं मी एक व्हिजन तयार करतोय.

मला या काही दिवसांत जिल्ह्यातील सर्वस्तरांतनं जे प्रेम मिळालं, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. त्याप्रती कर्तव्य भावनेतुन आणि माझ्या नवनिर्मितीच्यास्वभावानुसार राजकारणातलं एखादं पद घेऊन कामकरण्यापेक्षा संपुर्णतः अराजकीय परंतु सर्व राजकीयपक्षांना सोबत घेवुन, व्हिजनच हे अवघड वाटणारं पणअशक्य नसणारं काम मी हाती घेणार आहे. प्रचंडविश्वासाने मी हे व्हिजन तयार करुन त्याच्याफलितासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे.

आपण ज्या पिढीच्या खांद्यावर बसुन वाढलो,त्या पिढीला साक्षी ठेवुन आणि येणारी पुढची पिढीआपल्याला काहीच केलं नाही असं म्हणु नये, हीभावना ठेवुन हे आपल्या सर्वांना मिळुन करायचयं.त्यासाठी तुमची साथ होतीच, आताही आहे आणिइथुन पुढेही राहील या अपेक्षेसह…

धन्यवाद

कोण आहेत प्रशांत गडाख?

प्रशांत गडाख हे माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव आणि नेवासेचे माजी आमदार शंकरराव गडाख यांचे बंधू आहेत.

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत त्यांनी स्थानिक आघाडी, अर्थात क्रांतीकारी शेतकरी पक्षाची स्थापना केली. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ते या पक्षाच्या बॅनर खाली लढत आहेत.

यशवंतराव गडाख यांनी स्वर्गीय बाळासाहेब विखे यांचा 1991 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता.

प्रशांत गडाख हे यश प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.