लोहा मतदारसंघ शिवसेनेला सुटला, चिखलीकर समर्थक बंडखोरीच्या तयारीत

लोहा-कंधारमधून प्रवीण पाटील यांनाच उमेदवारी द्यावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी यावेळी केला. दोन दिवसांची वेळ द्या, असं आवाहन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलं आहे.

लोहा मतदारसंघ शिवसेनेला सुटला, चिखलीकर समर्थक बंडखोरीच्या तयारीत
Follow us
| Updated on: Oct 01, 2019 | 4:36 PM

नांदेड : शिवसेना-भाजपच्या जागा वाटपात नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार (Loha Kandhar Pratap Patil Chikhalikar) हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आलाय. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Loha Kandhar Pratap Patil Chikhalikar) समर्थकांनी एक मेळावा घेतला. ‘काहीही झालं तरी लोहा कंधार तो है हमारा’चा नारा या मेळाव्यात देण्यात आला. लोहा-कंधारमधून प्रवीण पाटील यांनाच उमेदवारी द्यावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी यावेळी केला. दोन दिवसांची वेळ द्या, असं आवाहन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलं आहे.

शिवसेना-भाजप जागा वाटपात लोहा हा मतदारसंघ पूर्वीपासून शिवसेनेच्या कोट्यात आहे. याच लोहामधून गेल्या वेळी स्वतः प्रताप पाटील चिखलीकर हे शिवसेनेच्या उमेदवारीवर आमदार झाले. कालांतराने चिखलीकर भाजपात गेले आणि लोकसभेला निवडून आले. मात्र त्यानंतर लोहा हा मतदारसंघ भाजपला सोडावा असा आग्रह कार्यकर्त्यांचा होता. मात्र शिवसेनेने त्यास नकार देत लोहामधून मुक्तेश्वर धोंडगे यांना उमेदवारी दिली.

चिखलीकर पूर्वी शिवसेनेतून निवडून येऊन भाजपमध्ये गेल्याने शिवसेनेने ही खेळी केली असावी असं बोललं जात आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेले चिखलीकर समर्थक आज एकत्र आले. लोहा आणि नांदेड दक्षिण हे दोन्ही मतदारसंघ आपल्याचकडे ठेवावेत, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

मेळाव्यात चिखलीकर समर्थकांची जोरदार भाषणे झाली. कार्यकर्त्यांनी प्रताप पाटील यांना साहेब तुम्ही खासदार बनून राहा, लोहा कंधारकडे येऊ देखील नका, आम्ही आमचं पाहू आणि प्रवीणला आमदार म्हणून निवडून आणू, असं आश्वासन कार्यकर्त्यांनी यावेळी दिलं. लोहा-कंधार मतदारसंघासोबतच कार्यकर्त्यांनी नांदेड दक्षिण मतदारसंघावर दावा केलाय. दक्षिणमधून प्रणिता देवरे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.

दरम्यान, घरासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून प्रताप पाटील चिखलीकर यांनी मार्गदर्शन केलं. मी आता मरेपर्यंत भाजपात राहणार आहे, त्यामुळे मला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू द्या, त्यानंतर लोहा-कंधारबाबत निर्णय घेऊ, असं आवाहन चिखलीकर यांनी केलं. गुरुवार सकाळपर्यंत याबाबत अंतिम निर्णय घेऊ. तोवर कार्यकर्त्यांनी शांत राहून संयम पाळावा. शिवसेना जाणीवपूर्वक त्रास देत असेल तर त्याची शिवसेनेला किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही खासदार चिखलीकर यांनी दिला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.