राज्यपाल नियुक्त आमदारकी म्हणजे नेत्यांची सोय लावण्याची जागा नाही : प्रवीण दरेकर
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांचा घोळ अद्यापही कायम आहे. त्यावर विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागा म्हणजे नेत्यांची सोय लावण्याची जागा नाही, असा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना लगावला आहे.
उस्मानाबाद: विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांचा घोळ अद्यापही कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. ‘विधान परिषदेतील जागा या राजकीय जागा नाहीत. तर त्या साहित्यिक, पत्रकार यांच्या आहेत. राज्यपालांनी कुणाला नियुक्त करावं याचे काही संकेत आणि परंपरा आहे. संविधान आणि राज्यघटनेनं राज्यपालांना जे अधिकारी दिले आहेत. त्या चौकटीत राहून राज्यपाल योग्य तो निर्णय घेतील. राजकीय नेत्यांची सोय लावण्याची ही जागा नाही’, अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. (Criticism of Praveen Darekar on MahVikas Aghadi from the Governor appointed seats of MLC)
राज्यपाल समजूतदार, लवकरच निर्णय घेतील- भुजबळ
विधानपरिषदेतील 12 राज्यपालनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari ) योग्य निर्णय घेतील. ते समजूतदार आहेत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी केले. राज्य सरकारने राज्यपालांकडे आमदारकीसाठी पाठवलेली सर्व नावे योग्य आहेत. सर्व निकषांचे पालन करूनच ही नावे निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे आता राज्यपाल यावर निर्णय घेतील, अशी आशा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
‘कोश्यारी यांनी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी जाहीर करावी’
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 6 नोव्हेंबरला संध्याकाळी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली. त्यानंतर अद्यापही राज्यपालांनी अद्यापही नावे जाहीर केलेली नाहीत. राज्यपालांनी 12 आमदारांची यादी जाहीर करावी, असं आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 8 नोव्हेंबरलाच केलं होतं.
12 सदस्यांमध्ये कोणाची नावं?
काँग्रेस
1) सचिन सावंत – सहकार आणि समाजसेवा 2) रजनी पाटील – सहकार आणि समाजसेवा 3) मुजफ्फर हुसैन – समाजसेवा 4) अनिरुद्ध वनकर – कला
राष्ट्रवादी काँग्रेस
1) एकनाथ खडसे – सहकार आणि समाजसेवा 2) राजू शेट्टी – सहकार आणि समाजसेवा 3) यशपाल भिंगे – साहित्य 4) आनंद शिंदे – कला
शिवसेना
1) उर्मिला मातोंडकर – कला 2) नितीन बानगुडे पाटील 3) विजय करंजकर 4) चंद्रकांत रघुवंशी
विधान परिषदेच्या सहाच्या सहा जागा जिंकणार, भाजपचा दावा
“विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक आहे. तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, या सर्व जागा आम्ही जिंकणार”, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. दरम्यान, मराठवाडा पदवीधर संघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भाजप नेते जयसिंगराव गायकवाड यांनी 17 नोव्हेंबरला चंद्रकांत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवून भाजपला सोडचिठ्ठी दिली. मात्र, “पक्षातून कुणी पलायन केलं तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.
संबंधित बातम्या:
राज्यपाल नियुक्त 12 जागांचा तिढा वाढला, ठाकरे सरकारकडून 15 दिवसांच्या मुदतीची शिफारस
Criticism of Praveen Darekar on MahVikas Aghadi from the Governor appointed seats of MLC