Pravin Darekar : ‘सत्ता असताना जनतेत गेले असते तर गठ्ठे गोळा करण्याची वेळ आली नसती’, प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

पुन्हा नव्याने शपथपत्र (Affidavit) घेऊन पक्ष घट्ट करण्याचा प्रयत्न आहे. पण सत्ता असताना जनतेत गेले असते, फिरले असते तर गठ्ठे करण्याची वेळ आली नसती, अशा शब्दात दरेकर यांनी ठाकरेंना टोला लगावलाय.

Pravin Darekar : 'सत्ता असताना जनतेत गेले असते तर गठ्ठे गोळा करण्याची वेळ आली नसती', प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरे, प्रवीण दरेकरImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 3:31 PM

मुंबई : वाढदिवसाला फुलांचे गुच्छ नको, भेट द्यायची असेल तर सदस्य नोंदणीचे अर्ज आणि शपथपत्रांचे गठ्ठे द्या, असा आदेशच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलाय. अरविंद सावंत यांच्या एका शाखेचं उद्घाटन रविवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ठाकरे यांनी उपस्थित नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हे आदेश दिले आहेत. मात्र, हाच धागा पकडत भाजप आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावलाय. पुन्हा नव्याने शपथपत्र (Affidavit) घेऊन पक्ष घट्ट करण्याचा प्रयत्न आहे. पण सत्ता असताना जनतेत गेले असते, फिरले असते तर गठ्ठे करण्याची वेळ आली नसती, अशा शब्दात दरेकर यांनी ठाकरेंना टोला लगावलाय.

प्रवीण दरेकर म्हणाले की, कुणी कुणाला संपवत नसते. ज्या विचारधारेवर पक्ष उभा राहिला त्याची प्रतारणा झाली की असं होतं. काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षानं आयुष्यभर हिंदुत्वाचा तिरस्कार केला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले तेव्हा ही अधोगती झाली. भाजपला अशी फूट पाडण्याची आवश्यकता नव्हती. तप पक्षप्रमुख आणि शिवसेना आमदारांमध्ये मतभेद झाले आणि त्यातून सेनेत फूट पडली, असा दावाही दरेकर यांनी केलाय.

‘शिंदे आणि फडणवीस ही जोडी राज्याला दिशा देईल’

शिंदे-फडणवीस सरकारवर अस्तित्वात आल्यापासून जनता आनंदी आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मागे गणपती बाप्पा उभा राहील. देवांनाही कळतं कुणाच्या मागे आशीर्वाद द्यावा. मुख्यमंत्री म्हणून शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस ही जोडी राज्याला दिशा देईल. महाराष्ट्र आणि मतदारसंघांच्या भविष्यासाठी ही जोडी टिकली पाहिजे. इतर आमदारांचा संपर्क होत आहे याचा अर्थ बदल होईल, असंही दरेकर यांनी म्हटलंय.

उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना नेमका आदेश काय?

मला वाढदिवसाला भेट द्यायची असेल तर मला फुलांचे गुच्छ नकोत. मला सदस्यांच्या अर्जांचे आणि पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे हवेत. याचं कारण आता त्यांनी प्रोफेशनल एजन्सी कामाला लावल्या आहेत. ही लढाई पैसा विरुद्ध निष्ठा अशी आहे. तुम्ही कितीही पैसा ओतला तरी हे माझं शिवसैनिकांचं वैभव त्यांना पुरुन उरेल, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे गटाला दिलाय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.