मुंबई: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांच्याविरुद्ध विशेषाधिकार भंगाची सूचना माडली आले. मुंबईतील विविध विकासकामांची वेळोवेळी माहिती मागूनही ती पुरवण्यात आली नाही. इतकच नाही तर वेळोवेळी लिहिलेल्या पत्राला एखादा अपवाद वगळता उत्तर देण्यात आलं नाही, असा आरोप दरेकर यांनी केलाय. (Praveen Darekar’s notice of violation of rights against BMC Commissioner)
महापालिका आयुक्तांची ही कृती म्हणजे विधान परिषद सदस्य म्हणून माझा आणि सार्वभौम सभागृहाचा विशेषाधिकार भंग आणि अवमान असल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. त्यामुळे विधान परिषद विशेषाधिकार समितीकडे चौकशीसाठी हे प्रकरण पाठवण्यात यावे आणि शक्य तितक्या लवकर सभागृहासमोर अहवाल सादर करण्याची सूचना सभागृहाला करावी, अशी मागणी दरेकर यांच्याकडून करण्यात आली आहे.
‘विधान परिषदेच्या सदस्य (विरोधी पक्ष नेता) म्हणून मुंबई महानगरपालिकेशी संबंधित विविध विकास कामांबाबतची, जनकल्याणविषयक बाबांची माहिती, विधिमंडळ कामकाजासाठी, माझे संसदीय कामकाजविषयक कर्तव्य पार पाडण्यासाठी उपलब्ध करुन देण्याची विनंती अनेक पत्राव्दारा महापालिका आयुक्तांना केली आहे. तसेच, माहिती प्राप्त न झाल्यामुळे स्मरणपत्रे देखील आयुक्तांना पाठविली आहेत. तथापि, अद्यापपर्यंत एखादा अपवाद वगळता माझ्या कोणत्याही पत्रांना उत्तरे देण्यात आलेली नाहीत, तसेच, मला माहिती देखील पुरविण्यात आलेली नाही,’ असा आरोप दरेकरांनी विशेषाधिकार भंगाच्या सूचनेत केला आहे.
‘सदस्यांनी विधिमंडळ कामकाजात जास्तीत जास्त सहभाग द्यावा, जनतेचे प्रश्न मांडावेत, अंमलबजावणी यंत्रणेच्या त्रुटी सभागृहामार्फत शासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, एकूणच शासनावर अंकुश ठेवावा, अशी अपेक्षा घटनाकारांनी संसदीय कामकाजात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या विधिमंडळाच्या सदस्यांकडून ठेवली आहे. असे करीत असताना निश्तिचपणे त्यांना आपले संसदीय कर्तव्य पार पाडण्यासाठी विविध शासकीय कार्यालयांकडील अधिकृत माहिती उपलब्ध होईल व त्याचा उपयोग करुन ते वस्तुनिष्ठ प्रश्न सभागृहात मांडू शकतील, असे अभिप्रेत आहे. माझे संसदीय कामकाज विषयक कर्तव्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित विकास कामांबाबतची, जनकल्याणविषयक बाबींबाबतची माहिती उपलब्ध न झाल्यामुळे मला जनतेच्या या प्रश्नांबाबत सभागृहात योग्य, अधिकृत व ठोस भूमिका मांडता आली नाही, माझे संसदीय कामकाजविषयक कर्तव्य बजावता आले नाही व माझ्या विधिमंडळ कामकाजात अडथळा निर्माण झाला आहे,’ असा आरोपही दरेकरांनी आपल्या सूचनेतून केला आहे.
दरेकरांनी मांडलेल्या सूचनेसोबत मागवलेल्या माहितीचे विषय, तारीख, पत्र क्रमांक आणि पत्र पाठवल्यानंतर झालेला कालावधी याबाबतचा तपशिल सोबत दिला आहे.
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/N3r1MrdMav
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 15, 2020
संबंधित बातम्या:
मेट्रो कारशेडचा निर्णय अहंकारातून घेतल्यानेच प्रकल्प रेंगाळला; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
निवडणुकीनंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय राजकीय हेतूने; दरेकरांची टीका
Praveen Darekar’s notice of violation of rights against BMC Commissioner