Praveen Kalme : प्रवीण कलमेंना 100 कोटींचं टार्गेट होतं, ते म्हाडातले ‘सचिन वाझे’, सोमय्यांच्या आरोपावर पहिल्यांदाच कलमेंची बाजू वाचा

| Updated on: Apr 15, 2022 | 5:33 PM

सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर प्रवीण कलमे आज माध्यमांसमोर आले. त्यांनी एबीपी माझाल्या दिलेल्या मुलाखतीत माझ्याविरोधातील एफआयआर सोमय्यांना कळला कसा? ते मुंबई पोलीस आहेत का? असा सवाल कलमे यांनी केलाय.

Praveen Kalme : प्रवीण कलमेंना 100 कोटींचं टार्गेट होतं, ते म्हाडातले सचिन वाझे, सोमय्यांच्या आरोपावर पहिल्यांदाच कलमेंची बाजू वाचा
प्रवीण कलमे, किरीट सोमय्या
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणात उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत दोन व्यक्ती गायब आहेत. त्यांना कुठे लपवून ठेवलं? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना केलाय. ते दोन व्यक्ती म्हणजे नंदकिशोर चतुर्वेदी आणि प्रवीण कलमे (Pravin Kalme) असल्याचं सोमय्या म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या दादर येथील श्री जी कंपनीत 29 कोटींचा मनी लाँड्रिंगचा पैसा आला असून तो हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदीच्या मदतीने आल्याचा आरोप सोमय्यांनी केला. तपास यंत्रणा चतुर्वेदींच्या शोधात असून ते गायब असल्याचे दिसून येत आहेत. तसेच प्रवीण कलमे यांनीही माझ्याविरोधात अनेक केसेस केल्या, मात्र आता तेदेखील गायब असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. दरम्यान, सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर प्रवीण कलमे आज माध्यमांसमोर आले. त्यांनी एबीपी माझाल्या दिलेल्या मुलाखतीत माझ्याविरोधातील एफआयआर सोमय्यांना कळला कसा? ते मुंबई पोलीस आहेत का? असा सवाल कलमे यांनी केलाय.

मला अडकवण्याचा प्रयत्न, कलमेंचा आरोप

किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप प्रवीण कलमे यांनी फेटाळून लावले आहेत. सोमय्यांचे आरोप हास्यास्पद आहेत. मी फरार नाही तर कामानिमित्त बाहेर आहे. माझ्यावर एफआयआर दाखल झाल्याची माहिती मला सोमय्यांच्या पत्रकार परिषदेतून मिळाली. एफआयआरची कॉपी मला अद्याप मिळालेली नाही. कोणत्याही यंत्रणेनं ना मला फोन केलाय, ना इमेल केलाय. माझे वकील लंडनला आहेत. आम्ही कायदेशीर प्रक्रिया करतोय, असं कलमे यांनी सांगितलं.

त्याचबरोबर माझ्याविरोधातील एफआयआर सोमय्यांना कळला कुठून? ते मुंबई पोलिस आहेत का? माझी तक्रार इकॉनोमिक ऑफेन्सकडे गेल्यानंतर माझ्याविरोधात तक्रार होते. हा एक ट्रॅप आहे. मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप प्रवीण कलमे यांनी केलाय.

किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले?

‘काही महिन्यांपूर्वी मी जितेंद्र आव्हाड यांचे वाझे यावर बोललो होतो. त्यानंतर प्रवीण कलमे यांनी माझ्याविरोधात अनेक तक्रारी केल्या. कोर्टात याचिका दाखल केली. कलमेंनी अनेक केसेस केल्या आणि आरोप केले. माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे. प्रवीण कलमे कुठे आहेत? आव्हाड त्याची माहिती देऊ शकतात का? की कलमे भारतात आहे की विदेशात आहे? प्रवीण कलमे यांच्याविरोधात एप्रिलमध्ये एफआयआर दाखल केला. ही सोमय्या यांनी केली नाही. तर एसआरएने दाखल केली आहे. कलमे सरकारी कार्यालयात येऊन फायली आणि कागदे चोरून नेत असल्याचा आरोप केला आहे. अजामीनपात्रं गुन्हा दाखल आहे. त्याच्याविरोधात का कारवाई होत नाही? त्यांना फरार का घोषित केलं जात नाही? त्याला कागद चोरताना पकडलं आहे. या गोष्टीला आज 15 दिवस झाले. कलमे विदेशात गेला? तो कसा गेला? त्यांना मदत कुणी जितेंद्र आव्हाड की अनिल परबांनी केली? आमच्या विरोधात आरोप करणारे आणि त्यांना पाठिंबा देणारे यावर उत्तर देणार का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.

इतर बातम्या :

Kolhapur By Election : कोल्हापूर उत्तरमधील मतदारांचा कौल कुणाला? उद्या निकाल, मतमोजणीची तयारी सुरु

Sharad Pawar Live : त्यांच्याकडे बोलायला काही नाही, शरद पवारांनी पुन्हा राष्ट्रवादीतल्या ओबीसी, आदिवासी नेत्यांची यादी वाचली, फडणवीस बोलणार?