पदवीधर निवडणुकांनंतर महाराष्ट्रातील सरकार बदलणार, प्रवीण दरेकरांचं मोठं विधान

पदवीधर निवडणुकीनंतर सरकार बदलण्याच्या हालचाली होणार असल्याचं मोठं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलंय.

पदवीधर निवडणुकांनंतर महाराष्ट्रातील सरकार बदलणार, प्रवीण दरेकरांचं मोठं विधान
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 6:02 PM

जालना : पदवीधर निवडणुकीनंतर सरकार बदलण्याच्या हालचाली होणार असल्याचं मोठं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलंय. मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी जालन्यातील परतूरमध्ये आयोजित मेळाव्यानंतर ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते (Pravin Darekar claim Maharashtra Government will change after Graduate Constituency election).

प्रवीण दरेकर म्हणाले, “राज्यातील जनता आज त्रस्त आहे. उद्या महाराष्ट्रातील पाचही जागा भाजप जिंकल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला तुमचं सरकार नकोय हे स्पष्ट होईल.” तुमच्या एक वर्षाच्या सरकाला जनता त्रस्त झाली आहे, असं म्हणत महाराष्ट्रात सरकार बदलण्याच्या हालचाली होतील असं मोठं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलंय.

दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत भाजपच विजयी होईल, असा दावा केलाय.  ते म्हणाले, “बिहार विधानसभा (Bihar Election) आणि देशभरात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये सुशिक्षित तरुणांना भाजपला पसंती दिल्याचे दिसून आले. राज्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही हाच ट्रेंड दिसून येईल.”

“राज्यातील आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. चंद्रकांत पाटील यांनी दोनवेळा पुणे पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्त्व केले आहे. त्यांनी पदवीधरांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला यंदा यश मिळेल. गेल्या काही दिवसांमध्ये बिहार आणि देशाच्या इतर भागांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये पदवीधर तरुणांना भाजपला मतदान केल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही हाच ट्रेंड कायम राहील,” असे दरेकर यांनी सांगितलं होतं.

‘ठाकरे सरकार अस्थिर, एकमेकांमध्ये ताळमेळ नाही’ राज्यातील ठाकरे सरकारची अवस्था म्हणजे कोणाचाही कोणाशी मेळ नसल्यासारखी आहे. त्यामुळे राज्यात अस्थिर वातावरण निर्माण झाले आहे. सुरुवातीला सरकारने 100 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल, असे सांगितले. ही वीज मोफत दिलीच नाही, उलट कोरोनाच्या काळात नागरिकांना वाढीव बिले आली. हे सरकार जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

संबंधित बातम्या :

देशभरात तरुणांची भाजपला पसंती; पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हाच ट्रेंड दिसेल: दरेकर

वीजबिले जबरदस्तीने वसूल करणारी ठाकरे सरकारची ही जुलमी राजवट; प्रवीण दरेकरांचा सरकारवर घणाघात

भाजपमध्ये मराठी माणसं नाहीत का?; प्रवीण दरेकरांचा राऊतांना सवाल

व्हिडीओ पाहा :

Pravin Darekar claim Maharashtra Government will change after Graduate Constituency election

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.