मुंबई – भाजपने (BJP) सहा ही जागा लढण्याची तयारी आहे. जर काँग्रेसने (Congress) उमेदवारी अर्ज माघे घेतला तर पक्ष नेतृत्व विचार करू शकतं असं प्रवीण दरेकरांनी (Pravin Darekar) म्हटलं आहे. भाजप पक्षाकडे प्रस्ताव पाठवला तर आमचं पक्ष नेतृत्व सुद्धा निर्णय घेऊ शकतं. तसेच दबाव तंत्र वापरण योग्य नाही असं त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं. अजित दादा संदर्भात केलेलं वक्तव्य स्पष्ट आहे. ते एक सक्षम नेतृत्व आहे. ती काही भाजपची अधिकृत भूमिका नाही. नियोजन शरद पवार यांच्या मार्गदर्शना खालीच होत असतं. मुख्यमंत्री सर्वांना आपलेसे करू शकले नाही असा टोला त्यांना उद्धव ठाकरेंना लगावला.
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुशंगाने प्रत्येक पक्षाने आपली मोट बांधायला सुरूवात केली आहे. त्यामुळे राजकीय रंगत वाढली आहे. राज्यसभेच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे अशा बातम्या आल्या. त्यानंतर राजकारण अधिक तापलं होतं. आता विधान परिषदेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. नेत्यांनी भेटी वाढवल्या असून मताधिक्य अधिक कसं मिळेल यासाठी प्रयत्न सुरू आहे. आज भाजपचे प्रसाद लाड यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. मनसेने राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपला मदत केली होती.
प्रसाद लाड यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी आम्ही साहा जागा लढवणार आत्तापर्यंत आशीचं परिस्थिती आहे. आम्हाला खात्री आहे की, या सरकारला अल्पमतात आणण्याची ताकद भाजपमध्ये आहे. द बेस्ट मुख्यमंत्री म्हणून आवार्ड मिळाला तरी आमदार त्यांच्यावर नाराज आहेत. हे राज्यसभेच्या झालेल्य निवडणूकीतून कळाले आहे. राज ठाकरे माझे मित्र आहेत नक्कीच मला ते मदत करतील असे वाटते. विखे पाटील बोलले असतील त्याबद्दल मला माहित नाही.
पण ते म्हणत असतील तर नक्कीच त्यांनी यायला काही हरकत नाही असं मीडियाला सांगितलं.