भाजपचा एकही आमदार खडसेंच्या संपर्कात नाही : प्रवीण दरेकर

इतर कोणता आमदार त्यांच्यासारखी राजकीय भवितव्याची आत्महत्या करेल," असा सवाल प्रवीण दरेकरांनी विचारला. (Pravin Darekar on Eknath Khadse quits bjp)

भाजपचा एकही आमदार खडसेंच्या संपर्कात नाही : प्रवीण दरेकर
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 5:49 PM

सातारा : “भाजपचा एकही आमदार एकनाथ खडसेंच्या संपर्कात नाही. ते कालपर्यंत पक्षात होते, त्यामुळे आमदार संपर्कात होते. फडणवीस कसे काम करतात हे माहिती असताना इतर आमदार त्यांच्यासारखी राजकीय भवितव्याची आत्महत्या का करेल,” असा सवाल भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. (Pravin Darekar on Eknath Khadse quits bjp)

एकनाथ खडसेंनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना, भाजपमधील 10 ते 12 आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. याबाबत प्रवीण दरेकरांनी विचारले असता त्यांनी खडसेंवर टीका केली.

“भाजपाचा एकही आमदार खडसेंच्या संपर्कात नाही. कालपर्यंत ते पक्षात होते म्हणून आमदार त्यांच्या संपर्कात होते. भाजपाचे भविष्य सर्वांना माहित आहे. दीर्घकाळ नेतृत्व करणारा एवढा मोठा पक्ष आहे. केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस काम कसे करत आहेत हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे इतर कोणता आमदार त्यांच्यासारखी राजकीय भवितव्याची आत्महत्या करेल,” असा सवाल प्रवीण दरेकरांनी विचारला.

तसेच पहाटेचा शपथविधीबाबत नैतिकता आणि राष्ट्रवादीत गेले की अनैतिकता असे खडसे म्हणाले होते. “आता ते त्याच राष्ट्रवादीत गेलेत ना, याबाबत फडणवीसांची बदनामी आम्ही भोगली आहे. राष्ट्रवादीतून शरद पवार खडसेंवर तोडपाणी करणारा नेता म्हणून आरोप करतच होते. त्यामुळे त्यांच्या पक्षात जाऊन त्यांनी नैतिकतेच्या गोष्टी करुन नयेत. त्यांना शुभेच्छा, नांदा सौख्य भरे” असे शब्दात प्रविण दरेकरांनी खडसेंवर टीका केली. (Pravin Darekar on Eknath Khadse quits bjp)

संबंधित बातम्या : 

खडसेंना राष्ट्रवादीत मंत्रिपद मिळेल, पण त्यांच्यासोबत कोणीच जाणार नाही; आठवलेंचा दावा

…म्हणून मला नाईलाजाने फडणवीसांचं नाव घ्यावं लागलं : एकनाथ खडसे

Eknath Khadse Exclusive | अजित पवारांसोबत पहाटे शपथविधी ही नैतिकता, मी राष्ट्रवादीत गेलो तर अनैतिकता का? खडसेंचा फडणवीसांना सवाल

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.