आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही संजय राऊतांची सवय : प्रविण दरेकर

| Updated on: Jun 28, 2021 | 4:32 AM

आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही सवय संजय राऊत यांना आहे, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही संजय राऊतांची सवय : प्रविण दरेकर
प्रविण दरेकर, विधानपरिषद विरोधी पक्षनेते
Follow us on

मुंबई : काँग्रेस केंद्रात सत्तेत होती त्यावेळेला ईडीच्या चौकशीचा दबाव टाकून सत्ता कशी राखली हे देशाला माहित आहे. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही सवय संजय राऊत यांना आहे. त्यांच्या टीकेला काडीची किंमत नसून त्यांचे वक्तव्य संदर्भहीन असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. आमदार प्रसाद लाड यांच्या कार्यालयात पंतप्रधान मोदींचा ‘मन की बात कार्यक्रम’ दाखवला गेला. लाईव्ह स्क्रीनद्वारे याचे प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर बोलत होते (Pravin Darekar criticize Sanjay Raut over criticism about ED raid).

मन की बात कार्यक्रमानंतर प्रविण दरेकर यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. प्रविण दरेकर म्हणाले, “ईडी आणि सीबीआय देशातील स्वायत्त संस्था आहेत. संविधानात लोकशाही इतकी मजबूत आहे की, देशात कोणाचेही सरकार असो या संस्थांचा चुकीचा वापर करता येत नाही. तपास यंत्रणा स्वायत्त असून त्यांच्या पद्धतीने ते काम करतात. चुकीचे काम केले असेल त्यांना तपास यंत्रणेच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागते. पण दुर्देवी हे आहे की, तपासाला सामोरं जात असताना त्यांना अडचणीत येतील अशी खात्री झाली असावी. बहुदा म्हणुन या विषयाला राजकीय रंग देण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत.”

“संजय राऊत यांना भाजप द्वेषाची काविळ झाली”

“आरोप किंवा तक्रार दाखल झाली तर कुठलीही एजन्सी हा तपास करते. त्यामुळे अशा प्रकारे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. संजय राऊत यांना भाजप द्वेषाची काविळ झाली आहे. अभ्यासाविना व अज्ञानापोटी राऊत फडणवीस व भाजपवर टीका करत असतात,” असा आरोपही दरेकर यांनी केला.

“फडणवीसांनीच मराठा व ओबीसी आरक्षण दिलीत”

“मराठा व ओबीसी आरक्षणासाठी फडणवीस सरकारनं काय केलं त्याची माहिती घेऊन बोलल्यास राऊत आरोप करू शकणार नाही. फडणवीसांनीच मराठा व ओबीसी आरक्षण दिलीत पण ती महाविकास आघाडीला टिकवता आली नाहीत. ओबीसी राजकीय आरक्षण ज्यावेळेला रद्द झालं त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अध्यादेश काढून कायद्यात रूपांतर करून दिलं. देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी राजकीय आरक्षण टिकवून ठेवलं,” असाही दावा दरेकरांनी केला. या कार्यक्रमाला आमदार कालिदास कोळंबकर, राजेश शिरवाडकर, नगरसेविका राजेश्री शिरवाडकर तसेच कार्यकर्ते व त्या विभागातील कार्यकर्ते उपस्थीत होते.

हेही वाचा :

राज्य सरकारचा मराठा आरक्षणाबाबत टाईमपास, त्यांच्या हलगर्जीपणामुळेच आरक्षण टिकलं नाही; प्रविण दरेकरांचा टोला

उद्धव ठाकरेंना मराठा आंदोलन म्हणजे आदळआपट वाटते, ते निव्वळ टाईमपास करतायत: दरेकर

जर ‘संघर्ष’ नको मग संवादातून मार्ग का काढत नाही? प्रवीण दरेकरांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल

व्हिडीओ पाहा :

Pravin Darekar criticize Sanjay Raut over criticism about ED raid