पहले मंदिर फिर सरकार घोषणा देणारी शिवसेना मंदिर उघडण्यापासून दूर का जाते?,प्रवीण दरेकरांचा सवाल

विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सत्ताधारी शिवसेनेवर मंदिर उघडणे आणि सीमा प्रश्नावरुन टीका केली आहे. (Pravin Darekar criticize Shivsena for delay in decision of temple opening)

पहले मंदिर फिर सरकार घोषणा देणारी शिवसेना मंदिर उघडण्यापासून दूर का जाते?,प्रवीण दरेकरांचा सवाल
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 4:21 PM

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंदिरं उघडणे, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न आणि मराठा आरक्षण आंदोलनावरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेनेने “पहले मंदिर फिर सरकार” ही घोषणा दिली होती. मात्र, शिवसेनच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकार मंदिर उघडण्यापासून दूर का जात आहे, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला. (Pravin Darekar criticize Shivsena for delay in decision of temple opening)

मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आल्यानंतर सरकारने निर्णय घ्यायला हवा होता. सरकारने त्यासाठी नियमावली बनवून मंदिर सुरु करण्याची गरज होती. मात्र, अजूनही निर्णय घेण्यात आला नाही. हे सरकार कशावरच गंभीर नाही.  मंदिरांचा प्रश्न फक्त लोकांच्या आस्थेचा विषय नाही तर लोकांच्या आर्थिक उपजीविकेचासुद्धा प्रश्न आहे. यामुळे भाजप मंदिर उघडण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी, असेल असं प्रवीण दरेकर म्हणाले.

सीमावादावरुन सेनेवर टीका

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरुन प्रवीण दरेकरांनी शिवसेनेवर टीका केली. सरकारच्या बाहेर राहून आरडाओरडा करण सोपं असत. विरोधी पक्षात असताना तुम्ही सीमा प्रश्नाबाबत टोकाची भूमिका घेत होतात. मग, आता का घेत नाही, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला. समन्वयाच्या माध्यमातून कर्नाटकमधील मराठी भाषिकांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला पाहिजे, असं प्रवीण दरकेर म्हणाले.

मराठा आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन मराठा आणि ओ.बी.सी. समाजात काही लोक वितुष्ट आणि संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत हे सत्य आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे राज्याचे मंत्री आहेत. त्यांनी एका समाजापुरती भूमिका घेता कामा नये, असं मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं.

मराठा आणि ओबीसी समाजाला न्याय कसा मिळेल अशी भूमिका सरकारकडे मांडली पाहिजे. पण, दुर्दैवाने समाजा-समाजात फूट पाडून राजकारण होत आहे. मुद्दामहून वाद चिघळत ठेवला जात आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये नाराजी आहे. परीक्षा आणि नोकरभरती पुरता तरी मार्ग काढावा,अशी माझी सरकारकडे विनंती आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

संबंधित बातम्या :

सुनील तटकरेंना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल : प्रवीण दरेकर

अशोक चव्हाणांचं ‘ते’ वक्तव्य सरकारची असमर्थता दर्शविणारे, प्रवीण दरेकरांची टीका

Pravin Darekar | उर्मिलाला उमेदवारी मग शिवसैनिकांचं काय? – प्रवीण दरेकर

(Pravin Darekar criticize Shivsena for delay in decision of temple opening)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.