एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांबद्दलचा पोटशूळ आणि तिरस्कार कमी करावा, प्रवीण दरेकरांचा हल्ला
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा पोठशूळ आणि तिरस्कार कमी करावा, असा हल्ला भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. Pravin Darekar crtiticise to Eknath Khadse not target Devendra Fadanvais
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा पोटशूळ आणि तिरस्कार कमी करावा, असा हल्ला भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. एकनाथ खडसेंनी पक्ष सोडताना देवेंद्र फडणवीसांना व्हिलन ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, आता त्यांनी हे थांबवावे, असं दरेकर म्हणाले. (Pravin Darekar criticize to Eknath Khadse not target Devendra Fadanvais )
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना ओबीसींना प्राधान्य देण्याचे काम झाल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. ओबीसींबद्दल भाजपची भूमिका राज्यातील सर्वांना माहिती आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी समाजाचे आहेत त्यामुळे ओबीसी म्हणजे खडसे नव्हेत. ओबीसी समाजातील अनेक लोकांना सत्तेतील आणि पक्षातील सन्मानाची पदे दिली गेली आहेत, त्याचा विसर खडसेंना पडला असावा, असा टोला दरेकर यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस यांना टारगेट करण्याचे काम करण्याचे आणि टीका करण्याचे काम एकनाथ खडसेंना दिले गेले असावे. एकनाथ खडसेंनी राज्यात अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवर लक्ष घालून ते सोडवण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला दरेकर यांनी दिला.
मराठा आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन मराठा आणि ओ.बी.सी. समाजात काही लोक वितुष्ट आणि संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत हे सत्य आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे राज्याचे मंत्री आहेत. त्यांनी एका समाजापुरती भूमिका घेता कामा नये, असं मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं.
मराठा आणि ओबीसी समाजाला न्याय कसा मिळेल अशी भूमिका सरकारकडे मांडली पाहिजे. पण, दुर्दैवाने समाजा-समाजात फूट पाडून राजकारण होत आहे. मुद्दामहून वाद चिघळत ठेवला जात आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये नाराजी आहे. परीक्षा आणि नोकरभरती पुरता तरी मार्ग काढावा,अशी माझी सरकारकडे विनंती आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
मंदिर उघडण्यावरुन शिवसेनेवर टीका
शिवसेनेने “पहले मंदिर फिर सरकार” ही घोषणा दिली होती. मात्र, शिवसेनच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकार मंदिर उघडण्यापासून दूर का जात आहे, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला.
मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आल्यानंतर सरकारने निर्णय घ्यायला हवा होता. सरकारने त्यासाठी नियमावली बनवून मंदिर सुरु करण्याची गरज होती. मात्र, अजूनही निर्णय घेण्यात आला नाही. हे सरकार कशावरच गंभीर नाही. मंदिरांचा प्रश्न फक्त लोकांच्या आस्थेचा विषय नाही तर लोकांच्या आर्थिक उपजीविकेचासुद्धा प्रश्न आहे. यामुळे भाजप मंदिर उघडण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी, असेल असं प्रवीण दरेकर म्हणाले.
संबंधित बातम्या :
पहले मंदिर फिर सरकार घोषणा देणारी शिवसेना मंदिर उघडण्यापासून दूर का जाते?,प्रवीण दरेकरांचा सवाल
सुनील तटकरेंना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल : प्रवीण दरेकर
(Pravin Darekar criticize to Eknath Khadse not target Devendra Fadanvais )