मुंबई : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या NOC गरज लागणार (Pravin Darekar on Uddhav Thackeray) नाही”, अशी खोचक टीका विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. राम मंदिराचे भूमिपूजन येत्या 5 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली (Pravin Darekar on Uddhav Thackeray) आहे.
प्रविण दरेकर म्हणाले, “उद्धव ठाकरे म्हणाले होते की, पहले मंदिर फिर सरकार पण आधी ते सरकारचे मुख्यमंत्री झाले आणि आता राम मंदिर होत आहे.”
“शरद पवार यांची जी भूमिका आहे तशीच भूमिका ते सुद्धा घेतील अस मला वाटत नाही. हिंदुत्व आणि राम मंदिरच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे कशाची पर्वा करणार नाही आणि शरद पवार यांच्या एनओसीची वाट पाहणार नाही”, असंही दरेकर यांनी सांगितले.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“सरकार चालवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला ठेवला आहे. पण त्यांनी पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर यावे”, असंही दरेकरांनी सांगितले.
उद्धव ठाकरे राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाणार का? यावर संजय राऊत म्हणतात…
“उद्धव ठाकरे यांना निमंत्रण आलं की नाही, याची चर्चा मीडिया करत आहे. पण आता फक्त तारीख जाहीर झाली आहे. राजकीय सोशल डिस्टन्सिंग ठेऊन कार्यक्रम कसा करता येईल, यावर न्यास निर्णय घेईल” असं संजय राऊत म्हणाले.
“राजकारणासाठी आम्ही अयोध्येत जात नाही. राम मंदिराचा पूर्ण रस्ता शिवसेनेने तयार केलेला आहे. मंदिरामध्ये येणारे मुख्य अडथळे होते ते शिवसेनेने दूर केले. राजकारण म्हणून नाही, तर श्रद्धा हिंदुत्व या भावनेतून शिवसैनिकांनी बलिदान दिलं. ते आमचं नातं कायम आहे” असं राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या :
Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला
उद्धव ठाकरे राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्येला जाणार का? संजय राऊत म्हणतात…