Pravin Darekar | मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीचे संकेत, प्रवीण दरेकर, सुरेश धस अडचणीत, भाजपचे नेते म्हणून कारवाई-दरेकर
मुंबै बँकेचे अध्यक्ष असताना भाजपचे आमदार सुरेश धस यांना नियम डावलून 27 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन राज्य सरकारकडून कारवाईचे संकेतही देण्यात आले आहेत. यामुळे पुन्हा एकदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Drekar) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
मुंबई : मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुंबै बँकेचे अध्यक्ष असताना भाजपचे आमदार सुरेश धस यांना नियम डावलून 27 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन राज्य सरकारकडून चौकशीचे संकेतही देण्यात आले आहेत. यामुळे पुन्हा एकदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Drekar) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. यापूर्वी देखील मुंबै बँकेच्या निवडणुकीवरुन प्रचंड राजकारण तापले होते. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, असं समीकरण त्यावेळी मुंबै बँकेत झाले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा राज्य सरकारकडून मुंबै बँकेवर चौकशीचे संकेत देण्यात आल्याने भाजपचे (BJP) नेते अडचणीत आले आहेत.
प्रवीण दरेकारांचा ‘मविआ’वर पलटवार
मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारकडून चौकशीचे संकेत मिळताच. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. दरेकर टीका करताना म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार दंडेलशाहीने कारभार करत आहे. मुंबै बँकप्रकरणी गुन्हा दाखल होत नसताना अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आहेत. हे आरोप न्यायालयात टिकले नाही तरी तुम्ही कारवाई करा, असे आदेश खुद्द राज्य सरकार अधिकाऱ्यांना देत आहे, असा आरोप प्रवीण दरेकारांनी राज्य सरकारवर केला आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक तुरुंगात गेल्याने सरकार भाजपचा कोणता नेता अडचणीत सापडतोय याची वाट पाहत आहे, असाही आरोप प्रवीण दरेकरांनी यावेळी केला आहे.
सुरेश धसांना दिलेले कर्ज योग्य?
मुंबै बँकेचे अध्यक्ष असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सुरेश धस यांना कोटी रुपायांचे कर्ज दिले होते. त्यावर दरेकर बोलताना म्हणाले की, सुरेश धस यांना दिलेले कर्ज योग्य आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारचे मुंबै बँकेवर विशेष प्रेम आहे. आता या प्रकरणाची चौकशी झाल्यावर आम्ही कागदाला कागद दाखवू, असं प्रसार माधमांशी बोलताना दरेकर म्हणाले.
…तर गृहमंत्र्यांची चौकशी करा-दरेकर
प्रविण दरेकरांनी राज्य सरकारवर टीका करताना राज्याच्या गृहमंत्र्यांवरही भाष्य केलं आहे. राज्य सरकार स्वत:च्या सोयीने वागत आहे. मुंबै बँकेने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना देखील कर्ज दिले होते. मग त्यांचीही चौकशी करावी. पण, सुरेश धस हे भाजपचे नेते आहेत आणि बीड जिल्ह्यातील सर्व नगरपालिका त्यांनी जिंकल्या म्हणून राज्य सरकार त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहे.
इतर बातम्या